रायपूर, 01 एप्रिल : कोरोनामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारने 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळं लोकांना घरातून बाहेर पडण्यास मनाई आहे. लॉकडाऊनमुळे सर्व सेवा बंद असताना 27 मार्च रोजी रायपूर येथे एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. ही मुले जन्मानंतरच चर्चेत आहेत ती त्यांच्या नावामुळे. लोकांमध्ये कोरोनाबाबत असलेली भीती दूर करण्यासाठी या मुलांच्या घरच्यांनी त्यांचे नाव कोरोना आणि कोव्हिड ठेवले आहे. एकीकडे कोरोनामुळं साऱ्या जगात चिंतेचे वातावरण असताना विनय वर्मा यांच्या घरात मात्र आनंदाचे वातावरण आहे. कारण त्यांच्या घरात जुळ्या मुलांचा जन्म झाला आहे. या मुलांची आई प्रीती वर्मा यांनी, “संपूर्ण देश कोरोनाविरूद्ध युद्ध लढा देत आहे. भारताच्या इतिहासात प्रथमच रेल्वे बंद आहे. प्रत्येक व्यक्ती घरात कैद आहे. अशा परिस्थितीत 27 मार्चची रात्र माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. एकीकडे जिथे लोक कोरोनामुळे त्रस्त आहेत, दुसरीकडे आमच्या घरात जुळ्या मुलांचा जन्म झाला”, असे सांगितले. म्हणूनच वर्मा दाम्पत्याने आपल्या मुलीचे नाव कोरोना आणि मुलाचे नाव कोव्हिड ठेवले आहे. वाचा- सेवानिवृत्तीच्या शेवटपर्यंत बजावलं कर्तव्य, महाराष्ट्र पोलिसांतील जवानाला सलाम मोटारसायकलने रुग्णालयात पोहोचल्या लॉकडाऊनमुळे रुग्णालयात जाण्यासाठी गाडी किंवा रिक्षा काहीच उपलब्ध नव्हती. त्यामुळं प्रीती यांना मोटारसायकलवरून रुग्णालयात जावेल लागले. रस्त्यावर तैनात पोलिसांनी मात्र त्यांना मदत केली. प्रीती यांच्या मते लोकांमध्ये असलेल्या या भीतीवर मात करण्यासाठी त्यांनी मुलांचे नाव कोरोना आणि कोव्हिड असे ठेवले आहे. वाचा - अखेर कोरोनाला मारण्याचा उपाय सापडला! WHO करणार शेवटची तपासणी मुलाचे नाव ठेवले लॉकडाऊन याआधी उत्तर प्रदेशमध्ये एका व्यक्तीने आपल्या मुलाचे नाव लॉकडाऊन ठेवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयाच प्रसार करण्यासाठी आणि लोकांमध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी आपल्या मुलाने नाव लॉकडाऊन ठेवल्याचे घरच्यांनी सांगितले होते. एकीकडे लोकांमध्ये भीतीचे वातावरण असताना, सध्या नावांमध्ये मात्र कोरोनाचा ट्रेंड आहे. वाचा- लॉकडाऊनमध्ये बेवड्यांचा कहर, थेट केला माजी मंत्र्यांना मेसेज आणि…