बीजिंग, 01 एप्रिल : कोरोनामुळे सध्या जगभरात हाहाकार माजला आहे. तब्बल 180 देश कोरोनाचा सामना करत आहेत. अद्याप एकाही देशाला कोरोनावर यशस्वी लस शोधता आलेली नाही आहे. या सगळ्यात एक दिलासादायक बातमी आली आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या पाच गंभीर रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. हे उपचार कोणत्याही औषधाने नाही तर रक्ताने केले गेले आहेत. उपचारासाठी वारण्यात आलेले रक्त हे त्या रुग्णांचे होते ज्यांना यापूर्वी कोरोना विषाणूची लागण झाली होती. चीनमधील रुग्णालयात या उपचाराची चाचणी करण्यात आली. या उपचारातून निरोगी झालेल्या तीन रुग्णांना घरीही पाठवण्यात आले आहे. या रूग्णांवर उपचार करणार्या डॉक्टरांचा असा विश्वास आहे, की वृद्ध रुग्णांच्या रक्ताने उपचार केल्यास कोरोना बरा होऊ शकतो. डेलीमेल वेबसाइटवर ही बातमी प्रसिद्ध झाली आहे. 27 मार्च रोजी चीनच्या शेनझेन थर्ड पीपल्स हॉस्पिटलने उपचारांच्या या पद्धतीचा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला. रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने सांगितले की, कोरोनाच्या रुग्णांच्या रक्ताने पाच रुग्णांवर उपचार करण्यात आले. या रुग्णांचे वय 36 ते 73 दरम्यान होते. वाचा- आता समूहात पसरतोय कोरोना, क्लस्टर आउटब्रेकमुळे 1000 लोकं क्वारंटाइन
Hope for coronavirus sufferers as five critically ill patients are saved in the space of 12 days https://t.co/Ck8fzjRkG5
— Daily Mail Online (@MailOnline) March 31, 2020
वाचा- दहशतवादी हल्ल्यापेक्षा कोरोना घातक, अमेरिकेत 9/11पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू ****रक्ताने मरणार कोरोना जुन्या रुग्णांच्या रक्ताने नवीन रुग्णांवर उपचार करण्याच्या या पद्धतीने कोव्हॅलेंट प्लाज्मा असे नाव शास्त्रज्ञांनी दिले आहे. यातून बरेच आजार बरे झाले आहेत. याद्वारे, जुन्या बरे झालेल्या रूग्णांचे रक्त नवीन रुग्णांच्या रक्तामध्ये मिसळून प्रतिकारशक्ती वाढविली जाते. या तंत्रामध्ये रक्ताच्या आत असलेल्या विषाणूशी लढण्यासाठी अॅंटीबॉडी तयार केले जातात. या अँटीबॉडीज विषाणूंविरूद्ध लढतात आणि त्यांना मारतात. शेन्झेन थर्ड हॉस्पिटलमध्ये संसर्गजन्य रोगांच्या अभ्यासासाठी राष्ट्रीय क्लिनिकल रिसर्च सेंटर देखील आहे. वाचा- मुंबईत अवघ्या 12 तासांमध्ये आढळले 16 नवे रुग्ण, राज्यात रुग्णांचा आकडा 320 वर WHOने केले कौतुक सुमारे 12 दिवसांपूर्वी या रुग्णालयात उपस्थित असलेल्या पाच रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले. त्यातील तीन पुरुष आणि दोन महिला होत्या. जुन्या बरे झालेल्या रूग्णांच्या रक्ताने शेनझेन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी या रूग्णांवर उपचार केले. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आरोग्य आणीबाणी कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. माईक रायन यांनी रक्ताच्या उपचारांबद्दल चिनी रुग्णालयाचा दृष्टीकोन उत्कृष्ट असल्याचे सांगितले.