सेवानिवृत्तीच्या शेवटच्या क्षणापर्यंत बजावलं कर्तव्य, महाराष्ट्र पोलिसांतील जवानाला सॅल्युट

सेवानिवृत्तीच्या शेवटच्या क्षणापर्यंत बजावलं कर्तव्य, महाराष्ट्र पोलिसांतील जवानाला सॅल्युट

लोहारा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक कांबळे. हे त्यांच्या सेवानिवृत्तीच्या अखेरच्या क्षणापर्यंत देशाची सेवा करण्यासाठी तत्पर राहिले.

  • Share this:

यवतमाळ, 01 एप्रिल : देशात कोरोनाने घातलेल्या हाहाकारामुळे संपूर्ण देशाला घरात बसण्याची वेळ आली. या महागंभीर आजारापासून वाचण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. पण अशात आपल्या रक्षणासाठी कायम उभे असलेले पोलीस मात्र आताही आपल्या आरोग्याचा विचार करत उभे आहेत. कोणीही नियम मोडू नये असं सांगत प्रत्येक पोलीस तैनात आहे. इतकंच नाही तर अगदी सेवानिर्वत्तीच्या अखेरच्या क्षणापर्यंत एका पोलीस कर्मचाऱ्याने आपलं कर्तव्य बजावलं आहे.

लोहारा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक कांबळे. हे त्यांच्या सेवानिवृत्तीच्या अखेरच्या क्षणापर्यंत देशाची सेवा करण्यासाठी तत्पर राहिले. पोलिस दलात आयुष्यातील 35 वर्षांची सेवा बजावली. सेवानिवृत्तीच्या आधी तीन महिने रजा मंजूर असतानाही त्यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले.

अशोक कांबळे आपल्या घरी स्वस्थ बसू शकले नाहीत. 35 वर्षांच्या सेवेतील अखेरच्या दिवशी संध्याकाळी ठीक सहा वाजेपर्यंत त्यांनी कर्तव्य बजावले. त्यांच्या या कार्याचं सर्वजण कौतूक करत आहेत. आपल्या कुटुंबाची आणि आरोग्याची तमा न बागळता पोलीस 24 तास तैनात आहेत. त्यांच्या या कार्याला खऱ्या अर्थाने सलाम द्यायला हवा.

संपूर्ण देश लॉकडाऊन केला असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, लोक आपापल्या घरात सुरक्षित रहावे यासाठी देशभर पोलीस तैनात केले आहे. आपला देश या संकटातून बाहेर निघावा, यासाठी धडपड सुरु आहे. अशोक कांबळे असेच आपले कर्तव्य बजावत होते. अखेरच्या दिवशी त्यांच्या सहकाऱ्यांनी गोडधोड खाऊ घातलं, तेव्हा कांबळे यांनाही जड अंत:करणाने सहकाऱ्यांचा निरोप घ्यावा लागला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2020 12:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading