JOIN US
मराठी बातम्या / देश / कोरोनाबाधितांसाठी स्टेडियम वापरण्याचा पर्याय, असा होईल वापर!

कोरोनाबाधितांसाठी स्टेडियम वापरण्याचा पर्याय, असा होईल वापर!

रुग्णांची संख्या वाढली तर भारतातील स्टेडियम हे विलगीकरणासाठी वापरणे सोईस्कर ठरणार आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी नवी दिल्ली, 31 मार्च : देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.  रुग्णांवर उपचार करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून वेगळी एक्स्प्रेस तयार करण्यात आली आहे. तर आता देशातील क्रिकेट  स्टेडियमचा वापरही केला जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशातील अधिकाधिक स्टेडियम विलगीकरण सुविधांमध्ये रुपांतरित करण्यात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हेही वाचा - FACT CHECK: खरंच वित्तीय वर्षात केली वाढ, केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा खुलासा स्टेडियममध्ये एकाचवेळी जास्त लोकांना क्वारंटाइन म्हणून ठेवता येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील अनेक स्टेडियम हे यासाठी वापरले जाणार आहे. या स्टेडियमध्ये मोठ्या संख्येनं बेड्स लावण्यात येतील. परंतु, या स्टेडियममध्ये व्हेंटिलेटरची सुविधा नसणार आहे. या स्टेडियममध्ये अशा लोकांनाच ठेवले जाणार आहे, ज्यांना विशेष उपचाराची आवश्यकता नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हेंटिलेटरसारखी सुविधा बसवण्यासाठी आणि ते वापरण्यासाठी मनुष्यबळ निर्माण करावे लागेल आणि त्यांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. याआधीही दिल्ली सरकारने जवाहरलाल नेहरू स्टेडियमचा  कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांसाठी क्वारंटाइन सेंटर म्हणून वापर करावा असा निर्णय घेतला आहे. तर, दक्षिण पूर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी हरलीन कौर यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरण सचिव यांना पत्र लिहून स्टेडियम हे जिल्हा प्रशासनाकडे सोपवावे अशी मागणी केली आहे.  हेही वाचा - चिंताजनक, 14 नाही तर तब्बल 20 दिवसांनी दिसली कोरोनाची लक्षणं दरम्यान, भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या  1251 वर पोहोचली आहे. त्यापैकी 1117 जणांना बाधा झाली  आहे, तर 32 लोकांचा कोरोनाने बळी गेला आहे. मात्र, 102 जणांनी या आजारावर मातही केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक लोक संक्रमित झाले आहेत. सोमवारी महाराष्ट्रात 216 लोक संसर्गित झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 39 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी महाराष्ट्रात दोन लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी एकाचा मृत्यू पुण्यात आणि दुसरा मृत्यू हा मुंबईत झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या