लखनऊ, 31 मार्च : कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातही भीती वाढत आहे. सध्या भारतात कोरोनाची 1251 प्रकरणे आहेत. त्यामुळे येते काही दिवस भारतासाठी महत्त्वाचे असणार आहे. प्रामुख्याने कोरोनाची लक्षणे उशीरा दिसल्यामुळं त्यांच्यावर वेळेत उपचार केले जात नाही आहेत. भारतात पहिल्यांदाच लखनऊमध्ये एका रुग्णात तब्बल 20 दिवसांनी कोरोनाची लक्षणे दिसली. त्यामुळं कोरोना सध्या आपले वर्तणूक बदलत असल्याचे दिसत आहे.
भारत सध्या ज्या टप्प्यात आहे, त्यात ही गोष्ट चिंताजनक आहे. कोरोनाची लागण झालेली ही महिला वृद्ध असून काही दिवसांपूर्वी त्या कॅनडा येथील स्थायिक आपल्या मुलाला भेटण्यासाठी गेल्या होत्या. यादरम्यान त्यांच्या 35 वर्षीय डॉक्टर सुनेला कोरोनाची लागण झाली होती. भारतात परतल्यानंतर या वृद्ध महिलेला घरातच विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला होता. त्याच्यामध्ये कुठलंही कोरोनाव्हायरसचं लक्षण दिसलं नाही. मात्र तब्बल 20 दिवसांनी त्यांना कोरोना झाल्याचे आढळून आले आहे.
कुठल्याही नव्या विषाणूचा मानवी शरीरात तग धरून संसर्ग पसरवण्याचा एक पॅटर्न असतो. या पॅटर्नला छेद देणारी केस भारतात सापडली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. साधारणत:14-15 दिवसांत कोरोनाची लक्षणे दिसून येतात. त्यानंतर त्या रुग्णांची चाचणी केली जाते. क्वारंटाईनमध्ये राहिल्यानंतर आठवड्याभरात रुग्ण पॉझिटिव्ह आहे की नाही हे कळते. मात्र पहिल्यांदाच हे कळण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी लागला.
सलमान खानच्या भाच्याचं निधन, कोरोनाची तपासणी करण्यासाठी पाठवले सँपल
दरम्यान, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेची प्रकृती स्थिर असली तरी, MIL चाचणीचे रिपोर्ट तब्बल 20 दिवसांनी आले ही चिंतेची बाब आहे. एक ते दोन आठवड्यात कोरोनाची लक्षणे दिसणे अपेक्षित आहे. भारतात पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे.
VIDEO : नर्सने सांगितली मुंबईतल्या पहिल्या Corona रुग्णाची अवस्था कशी होती?
ICMR च्या सल्ल्याप्रमाणे या विषाणूचा जिवंत किंवा अॅक्टिव्ह राहण्याचा कालावधी 14 दिवसांचा असतो. त्यामुळे आतापर्यंत सर्वांना 14 दिवसांचा क्वारंटाइनचा सल्ला दिला जात होता. 20 व्या दिवशी लक्षणं दिसलेला हा भारतातला पहिलाच रुग्ण असावा, असे लखनऊच्या डॉक्टरांनी सांगितलं. कोरोनाव्हायरसचं वागणं बदललं असेल आणि लक्षणं दिलायला अशा उशीर लागत असेल तर भारतात क्वारंटाइनचे नियम आणि मुदत बदलावे लागणार आहे.
भारतात कोरोना तिसर्या टप्प्यात पोहोचला नाही
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाने अद्याप फार डोके वर काढलेले नाही. तिसऱ्या टप्प्यात पोहोचला नाही. 21 दिवसांचा लॉकडाऊनची मुदत वाढविण्याची तातडीची योजना नाही, असे सोमवारी सरकारने सांगितले आहे. भारतीय सैन्याने पुढील महिन्यात संभाव्य आणीबाणीच्या घोषणेविषयी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेली 'बनावट' पोस्ट नाकारलं आहे.
मुंबईत लॉकडाऊन अधिक कडक, अनेक भागांमध्ये SRPF च्या तुकड्या तैनात
Published by:Manoj Khandekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.