coronavirus delhi
मुंबई : कोरोना कंट्रोलमध्ये आला असं म्हणता म्हणता आता पुन्हा एकदा वेगानं पसरायला लागला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मास्कच्या गाइलाइन्स पुन्हा आल्या आहेत. कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण आता 28 टक्क्यांपर्यंत पोहोचवं आहे अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुन्हा कोरोनाचे रुग्ण वेगानं वाढत असल्याने केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं आहे. राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासात, कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या 1767 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. २४ तासांत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने बुधवारी शेअर केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली. आरोग्य विभागाकडून आलेल्या बुलेटिननुसार, दिल्लीतील संसर्गाचा दर २८ टक्क्यांच्या पुढे गेला आहे.
कोविड लशीचा खडतर प्रवास; भारतातील कोरोना लसीकरणाची थक्क करणारी Inside Storyगेल्या वर्षी 14 जानेवारी रोजी राष्ट्रीय राजधानीत संसर्गाचे प्रमाण 30.6 टक्के होते. दिल्ली आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार बुधवारी दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या 6046 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या एकूण ५७९१ चाचण्या करण्यात आल्या. मंगळवारी ७९३ रुग्ण कोरोनातून बरे झाले होते.
काही दिवस दिल्ली आणि इतर महानगरांमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत लोकांनी विशेष सतर्क राहण्याची गरज आहे. कोरोना टाळण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे इतर लोकांच्या संपर्कात येण्यापासून शक्य तितके स्वतःचे संरक्षण करणे.
बाहेरचा माणूस म्हणजे संशयाने पाहिला जायचा तिथे कशी पोहोचली वॅक्सीन? पाहा VIDEOमास्क घालणे, हात न हलवणे आणि गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहणे याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. अशा वेळी जेव्हा कोरोनाचा धोका असतो, तेव्हा कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा महागात पडू शकतो. अशा परिस्थितीत सावध राहून आणि सर्वांपासून अंतर ठेवल्यास कोरोनाचा संसर्ग टाळता येऊ शकतो.