दिल्ली, 24 मार्च : भारतातील विविधतेचा नेहमीच अभिमान वाटतो. प्रत्येक राज्य, प्रदेशाचं एक भौगोलिक वैशिष्ट्य आहे. पण हेच वैशिष्ट्य कोरोना महासाथीच्या काळात देशासमोर मोठं आव्हान होतं. कोरोना लसीकरण कालावधीत कोरोना लशीने संपूर्ण देशात खडतर प्रवास केला आहे. कोरोना लसीकरणाचा हाच प्रवास उलगडणारी अशी हिस्ट्री टीव्ही 18 ची 'द वायल - इंडियाज व्हॅक्सिन स्टोरी' ही डॉक्युमेंट्री.
लस उत्पादक ठिकाणाहून ते देशाच्या कानाकोपऱ्यात राहत असलेल्या तुमच्यापर्यंत कोरोना लस पोहोचली. कोरोना लसीकरणाचा हा प्रवासवाटतो तितका सोपा नव्हता. आधी विमान, नंतर ट्रक, कार, बोट आणि शेवटी पायी... अशी ही लस तुम्हाला मिळाली आहे. "कोरोना लशी ठिकठिकाणी पोहोचवण्यासाठी दिवसरात्र विमानं उडत होती. यासाठी खूप मेहनत लागली. आम्ही बरीच सरकारी कामंही रोखून
ठेवली", असं पंतप्रधान मोदी यांनी 'द वायल - इंडियाज व्हॅक्सिन स्टोरी' मध्ये सांगितलं.
शुक्रवारी रात्री 8 वाजता प्रसारित झालेल्या माहितीपटात अभिनेता आणि निवेदक मनोज बाजपेयी यांनी मिझोराममधील एका लहान गावात लस कशा पोहोचल्या हेसुद्धा सांगितलं आहे.
जिथं कोरोना लशीची निर्मिती होत होती, त्या पुण्यातून नन्सुरी गावात लशीचा 1500 किमीचा प्रवास सुरू झाला. त्यांनी सांगितलं, ते प्रथम कोलकात्याच्या प्रादेशिक स्टोरेज सेंटरमध्ये पोहोचले. तिथून त्यांना आयझॉल इथं नेण्यात आलं. त्यानंतर हा प्रवास ट्रकमधून लुंगलेईपर्यंत, कारमधून त्लाबुंगपर्यंत आणि शेवटी बोटीने नन्सुरीपर्यंत सुरू राहिला. मात्र आव्हान अजून संपलं नव्हतं. जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेत एकही ग्रामस्थ मागे राहू नये याची खात्री करण्यासाठी आरोग्य सेवा कर्मचारी आणि लसीकरणकर्ते पायी निघाले. देशातून विषाणू दूर करण्याच्या भावनेने सर्वांनी स्वतःला यात झोकून दिलं होतं, त्यामुळे आणखी काही मार्गही सापडले. नागालँड आणि मणिपूर या ईशान्येकडील राज्यांच्या दुर्गम भागात लस पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोविन ठरलं गेमचेंजर, ‘The Vial – India’s Vaccine Story’ मध्ये PM मोदींचा खुलासा
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे शास्त्रज्ञ डॉ. सुमित अग्रवाल म्हणाले, "जर आम्ही लशी या दुर्गम भागात ड्रोनद्वारे पोहोचवू शकलो, तर भारताच्या कोणत्याही भागात पोहोचवू शकतो, हेच आमचं लक्ष्य होतं."
शास्त्रज्ञ आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांच्या माणसांना वाचवण्याच्या इच्छाशक्तीमुळेच भारताने लसीकरणात असा विक्रेम केला, ज्याचं जगभरात कौतुक होत आहे.
काय आहे 'द वायल - इंडियाज व्हॅक्सिन स्टोरी'?
देशाच्या अविश्वसनीय कोविड-19 लशीच्या प्रवासावरील नवीन माहितीपट. कोविड-19 लशीच्या कुपीच्या निर्मितीमध्ये काय घडले याची अंतर्गत कथा जिवंत करते. अभूतपूर्व वेळेत लस विकसित, उत्पादन आणि वितरित करण्यात देशाचं यश दाखवते. 60 मिनिटांची डॉक्युमेंट्री जिथं पंतप्रधान मोदींनी कोरोना महासाथीविरोधात भारताच्या विजयाबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे.. ‘द व्हायल’ काही केस स्टडीजवर बारकाईने लक्ष वेधून घेतं, ज्याने भारत सरकार आणि आरोग्य कर्मचार्यांच्या निर्धारावर प्रकाशझोत टाकला.
The Vial : बाहेरचा माणूस म्हणजे संशयाने पाहिला जायचा तिथे कशी पोहोचली वॅक्सीन? पाहा VIDEO
आज, भारतातील बहुसंख्य 1.3 अब्ज लोकांना लशीचा किमान एक डोस मिळाला आहे - देशाची विविधता लक्षात घेता हे एक कठीण काम आहे. भारताने लस मैत्री उपक्रमाद्वारे जगासमोर एक उदाहरणही ठेवले आहे ज्याद्वारे 100 देशांमध्ये कोविड-19 लशीचे 232.43 दशलक्ष डोस देण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus, Covid-19, Health, Lifestyle, Vaccine