JOIN US
मराठी बातम्या / देश / देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या 15 हजार 700 वर, तर मृत्यूने ओलांडला 500चा आकडा

देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या 15 हजार 700 वर, तर मृत्यूने ओलांडला 500चा आकडा

23 राज्यांमधल्या 54 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांपासून एकही रुग्ण आढळला नाही. आत्तापर्यंत 2,231 रुग्ण बरे झाले आहेत.

जाहिरात

Navi Mumbai: Shiv Sena MP Rajan Vichare being tested for COVID-19 during the nationwide lockdown to curb the spread of coronavirus, in Navi Mumbai, Saturday, April 18, 2020. (PTI Photo)(PTI18-04-2020_000127B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 19 एप्रिल: देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. गेल्या24 तासांमध्ये COVID19चे 1334 रुग्ण आढळले. तर 24 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे बाधितांची संख्या 15712 तर मृतांचा आकडा 507 वर गेला आहे. पाँडेचेरी इथल्या माहे आणि कर्नाटकमधल्या कोडगू जिल्ह्यात गेल्या 28 दिवसांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. 23 राज्यांमधल्या 54 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांपासून एकही रुग्ण आढळला नाही. आत्तापर्यंत 2,231 रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत 3,86,791 एवढ्या टेस्ट करण्यात आल्या आहेत अशी माहिती ICMRचे रमण गंगाखेडकर यांनी दिली. देशात कोरोनाचं थैमान सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (NHAI) 20 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर टोल कर वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानं देशभरात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सरकारने 25 मार्चपासून टोल टॅक्स वसूल करण्यासाठी तात्पुरती स्थगिती दिली होती. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणं अधिक सोयीचं झालं होतं. आज मध्यरात्रीपासून हा तात्पुरता स्थगित केलेला टॅक्स पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. हे वाचा- ‘रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे’, संजय राऊत भडकले टीआयने दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य आणि राज्यातील सर्व ट्रक व इतर मालवाहतूक वाहनांच्या वाहतुकीसाठी दिलेली सूट देण्याबाबत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्राधिकरणाला पत्र लिहिले आहे. 20 एप्रिलपासून पुन्हा टोल टॅक्स वसूल करण्यात येणार आहे.

देशात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू आहे. 3 मेपर्यंत हा लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले आहे. दरम्यान लॉकडाऊन संपल्यानंतर सुद्धा देशातील ट्रेनची आणि हवाई वाहतूक सुरू होण्याची शक्यता कमी आहे.  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रृप ऑफ मिनिस्टर्सच्या (GoM) बैठकीत अशी माहिती देण्यात आली की, याविषयी आरोग्य मंत्रालयाकडून माहिती घेतल्यानंतरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल. (हे वाचा- 20 एप्रिलपासून मोबाइल रिचार्जची दुकानं सुरू होणार? जाणून घ्या काय आहे योजना ) जीओएम प्रवासी रेल्वे गाड्या सुरू करण्याच्या पक्षात नाही आहेत. रेल्वे सुरू झाल्यास सोशल डिस्टंसिंगचे नियम मोडले जाण्याची भीती आहे. त्याचप्रमाणे केंद्राकडून एअक इंडिया तसंच अतर एअरलाइन्सने सुद्धा 3 मेनंतर जर बुकिंग सुरू केले असल्यास ते रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेच.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या