नवी दिल्ली, 19 एप्रिल : उद्योग संघटना असणाऱ्या सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (COAI) फीचर फोन ग्राहकांना रिचार्जची सुविधा देण्यासाठी राज्यांशी संपर्क करण्याचा निर्णय घेतला आहे. सीओएआय यांनी यासंदर्भात अशी माहिती दिली आहे की, ते याकरता सर्व राज्यांना पत्र लिहून किरकोळ रिचार्ज केंद्र उघडण्यास सांगणार आहेत. शुक्रवारी COAIने कर्नाटक सरकारबरोबर झालेल्या कॉन्फरन्स कॉलदरम्यान हा मुद्दा उपस्थित केला.
“We will approach all States to open retail recharge centres along with required pass for movement of staff who will man these centres to facilitate feature phone users,” said Rajan Mathews, DG, COAI. @DoT_India @rsprasad #StayConnected #Covid_19 pic.twitter.com/C5r5cyAD3M
— COAI (@ConnectCOAI) April 17, 2020
सीओएआय चे महासंचालक राजन मॅथ्यू यांनी अशी माहिती दिली आहे की, ते सर्व राज्यांना पत्र लिहून रिचार्ज केंद्र सुरू करण्यासंदर्भात सांगणार आहेत. त्याचप्रमाणे या केंद्रावर काम करणाऱ्यांसाठी आवश्यक पाससाठी देखील मागणी करण्यात येईल, असही ते म्हणााले. ते पुढे म्हणाले की, आम्ही फीचर फोन ग्राहकांच्या सुविधेसाठी किरकोळ रिचार्ज सेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकारांना आग्रह करणार आहेत. मॅथ्यू यांनी सांगितलं आहे की दूरसंचार सुद्धा आवश्यक सेवांमध्ये सामाविष्ट आहे. त्यामुळे ही सेवा सुरू करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
(हे वाचा-Amazon, Flipkart वरून 'या' वस्तूंच्या पुरवठ्यावर निर्बंध, गृह मंत्रालयाचे आदेश)
राज्यात अनेक ठिकाणं अशी आहेत, जिथे अद्याप रिचार्जसारख्या सेवांसाठी डिजीटल माध्यमांचा वापर केला जात नाही. परिणामी रिचार्ज करण्यासाठीही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. दरम्यान 20 एप्रिलपासून काही सुविधा पूर्ववत करण्यात आहेत.
संपादन - जान्हवी भाटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus