JOIN US
मराठी बातम्या / देश / रुग्णसंख्या वाढल्याने पुन्हा कडक लॉकडाऊन, 'या' राज्याने घेतला निर्णय

रुग्णसंख्या वाढल्याने पुन्हा कडक लॉकडाऊन, 'या' राज्याने घेतला निर्णय

लॉकडाऊन केल्यामुळे देशावर घोंघावत असलेले कोरोना संकट नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत पुढे ढकललं गेलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चेन्नई, 15 जून : दोन महिन्यांच्या देशव्यापी लॉकडाऊन केल्यामुळे देशावर घोंघावत असलेले कोरोना संकट नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत पुढे ढकललं गेलं आहे. भारतात करोना संकट नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात परमोच्च बिंदूवर पोहोचेल आणि त्यावेळी विलगीकरण तसेच आयसीयू खाटांची आणि व्हेंटिलेटर्सची कमतरता भासेल, असा निष्कर्ष भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) पुढाकाराने करण्यात आलेल्या एका अभ्यासात काढण्यात आला आहे. लॉकडाऊन हटवल्यानंतर असा निष्कर्ष काढला जात असतानाच आता दक्षिण भारतातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दक्षिण भारातातील तामिळनाडूमध्ये पुन्हा कडकडीत लॉकडाऊन करण्यात आला आहे. तमिळनाडूच्या 4 जिल्ह्यांमध्ये कडकडीत लॉकडाऊन असणार आहे. 19 जून ते 30 जून या दरम्यान हा लॉकडाऊन असले. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तामिळनाडू सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. चेन्नई, तिरुवेलूर, कांचीपुरम, जिंगलपेठ या भागात कडक लॉकडाऊन असेल. यामध्ये रिक्षा, बस सेवा पूर्णपणे बंद असणार आहे. सरकारी कार्यालयात फक्त 33 टक्के हजेरी असेल, तर अत्यावश्यक सेवांची दुकान सकाळी सहा ते दुपारी दोन पर्यंत सुरू राहणार आहेत. हेही वाचा - मोदी सरकारचा एक निर्णय चीनला पडणार भारी, होईल मोठं नुकसान दरम्यान, जगभरात कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या 80 लाखाच्या जवळपास पोहोचली आहे. डब्ल्यूएचओच्या मते, गेल्या 24 तासांत 1 लाख 22 हजार 298 नवीन प्रकरण पुढे आल्यानंतर, जगातील कोरोना रुग्णाची संख्या वाढून 79,82,822 झाली आहे. त्याच वेळी, या साथीच्या आजारामुळे 4,35,166 लोकांचा जीव गेला आहे. संपादन - अक्षय शितोळे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या