भावनगर, 12 एप्रिल : गुजरातमध्ये भावनगर जिल्ह्यात एका चार वर्षांच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी तिच्या आई वडिलांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार ही कारवाई यासाठी करण्यात आली कारण मुलीच्या कुटुंबियांनी लॉकडाऊनचं उल्लंघन करत मुलीला घेऊन एका नातेवाईकाच्या घरी गेले होते. पोलिसांनी सांगितले की, मुलीचे वडिल जमुनाकुंड भागात राहतात. त्यांनी आपण सरकारी अधिकारी असल्याचं सांगत शुक्रवारी पोलिसांना एक कागदही दाखवला होता. त्यानंतर दुचाकीवरून पत्नी आणि मुलीसह 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात नातेवाईकाकडे गेले होते. चार वर्षांच्या मुलीला शनिवारी कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर तिला भावनगरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याशिवाय मुलीचे आई वडिल आणि तिच्या संपर्कात आलेल्या इतर दोन व्यक्तींना रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. हे वाचा : भावाच्या मृत्यूनंतर डगमगली नाही, अंत्यसंस्कारानंतर कोरोनाच्या लढ्यात झाली तैनात मुलीच्या आई वडिलांविरुद्ध रविवारी भारतीय दंड संहिता कलम 170, कलम 269, कलम 270 आणि कलम 188 नुसार एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, त्यांच्याविरुद्ध साथीच्या रोगाच्या कायद्याच्या नियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. हे वाचा : होम क्वारंटाइनमध्ये एकटं राहणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, सडलेल्या अवस्थेत मिळालं शव