जाहिरात
मराठी बातम्या / देश / भावाच्या मृत्यूनंतरही डगमगली नाही, अंत्यसंस्कारानंतर कोरोनाच्या लढ्यासाठी झाली तैनात; CM म्हणाले म्हणून ही कोरोना वॉरिअर्स

भावाच्या मृत्यूनंतरही डगमगली नाही, अंत्यसंस्कारानंतर कोरोनाच्या लढ्यासाठी झाली तैनात; CM म्हणाले म्हणून ही कोरोना वॉरिअर्स

भावाच्या मृत्यूनंतरही डगमगली नाही, अंत्यसंस्कारानंतर कोरोनाच्या लढ्यासाठी झाली तैनात; CM म्हणाले म्हणून ही कोरोना वॉरिअर्स

ही वेळ अत्यंत कठीण आहे. घरात भावाचा मृत्यू झाला असतानाही न डगमगता नीलिमा देशसेवेसाठी उभी आहे. तिची कर्तव्यनिष्ठा प्रेरणादायी आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

देवास, 12 एप्रिल : सध्या देशभरात कोरोनाचा (Covid - 19) कहर वाढत असला तरी अनेक वॉरिअर्स कोरोनाविरोधातील (Coronavirus) लढा कोणतीही तक्रार न करता लढत आहेत. त्यांच्या आयुष्यातील आलेल्या अनेक आव्हानात्मक प्रसंगात तोंड देत ते आपल्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. समीप येथील ग्राम शिप्रा येथे राहणारी एएनएम आणि आयुष्यमान योजनेची समन्वयक नीलिमा परमार हिच्या भावाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असतानाही तिने देशसेवेचे काम सुरूच ठेवलं. भावाच्या मृत्यूनंतरही तिने कोरोना व्हायरसच्या संकटाशी सामना देत असनाचे काम सुरूचं ठेवले. दु:खाच्या या प्रसंगी नीलिमा भावाच्या अंत्यदर्शनात सहभागी झाली. आपली वहिनी आणि कुटुंबीयांना आधार दिला आणि त्यानंतर ड्यूटीवर तैनात झाली. नीलिमा कोरोनाला रोखण्यासाठी फिल्डवर जाऊन लोकांना महत्त्वपूर्ण माहिती पूरविण्याचे काम करते. लोकांना सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व पटवून देते. नीलिमाने सांगितलं की, त्यांची टीम मुख्य चौकांमध्ये माइकवरुन नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्याच्या उपाययोजना, सोशल डिस्टन्सिंगच महत्व सांगत आहे.

जाहिरात

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ( shivraj singh chauhan) यांनी सोशल मीडियावर नीलिमाच्या कर्तव्यनिष्ठेचं कौतुक केलं आहे. घरातील इतक्या दु:खद प्रसंगातही ती आपलं काम नेटाने करीत आहे. त्यांच्या अशा अभूतपूर्व कामामुळे त्यांना कोरोना वॉरियर्स म्हटलं जात असल्याचे शिवराज सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. भास्कर समूहाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे आणि मुख्यमंत्र्यांनी ही बातमी आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन ट्विट केली आहे. संबंधित - वादातून महिलेने उचललं धक्कादायक पाऊल, पोटच्या लेकरांना दिलं गंगेत फेकून तबलिगींवर कारवाईचा बडगा, क्वारंटाइन संपतात तुरुंगात रवानगी संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात