JOIN US
मराठी बातम्या / देश / मोदी सरकारचा मोठा निर्णय, राष्ट्रीय महामार्गावर उद्यापासून होणार टोल टॅक्स वसूली

मोदी सरकारचा मोठा निर्णय, राष्ट्रीय महामार्गावर उद्यापासून होणार टोल टॅक्स वसूली

25 मार्चपासून टोल टॅक्स वसूल करण्यासाठी तात्पुरती स्थगिती दिली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 एप्रिल : देशात कोरोनाचं थैमान सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (NHAI) 20 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर टोल कर वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानं देशभरात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सरकारने 25 मार्चपासून टोल टॅक्स वसूल करण्यासाठी तात्पुरती स्थगिती दिली होती. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणं अधिक सोयीचं झालं होतं. आज मध्यरात्रीपासून हा तात्पुरता स्थगित केलेला टॅक्स पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. हे वाचा- ‘रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे’, संजय राऊत भडकले टीआयने दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य आणि राज्यातील सर्व ट्रक व इतर मालवाहतूक वाहनांच्या वाहतुकीसाठी दिलेली सूट देण्याबाबत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्राधिकरणाला पत्र लिहिले आहे. 20 एप्रिलपासून पुन्हा टोल टॅक्स वसूल करण्यात येणार आहे. एनएचएआयचे प्रकल्प संचालक एनएन गिरी यांनी सांगितले की, टोल नाक्यावर 20 एप्रिलपासून कर वसुली सुरू केली जाईल. कर वसुलीदरम्यान, ग्राहकांना फास्ट टॅग लावून घेणं आणि ऑनलाईन पेमेंटच करावं यासाठी आवाहन केलं जाणार आहे. पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी वेगळी रांग असणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंगचं भाग बाळगणं आवश्यक आहे. हे वाचा- आईचं दूध नवजात बाळासाठी संजीवनी, जीवघेण्या व्हायरसपासून करतं संरक्षण संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या