आईचं दूध नवजात बाळासाठी संजीवनी, जीवघेण्या व्हायरसपासून करतं संरक्षण

आईचं दूध नवजात बाळासाठी संजीवनी, जीवघेण्या व्हायरसपासून करतं संरक्षण

ब्रेस्टफिडिंगमुळे (Breastfeeding) नवजात बाळांमधील (Infants) व्हायरसची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी होते, असं एका संशोधनात दिसून आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 एप्रिल : भारतात कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) एका 45 दिवसांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे, शिवाय आणखी एक 20 महिन्यांचं बाळही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं आहे. त्यामुळे आता चिंता अधिक वाढली आहे. तज्ज्ञांच्या मते, मानवी शरीरात आधीपासूनच अनेक व्हायरस असतात, त्यांना ह्युमन व्हायरोम असं म्हटलं जातं. बहुतेक व्हायरस हे आतड्यांमध्ये असतात, मात्र शरीराच्या इतर भागातही त्यांचं अस्तित्व असतं आणि ते आयुष्यभर शरीरात राहतात. मात्र नवजात बाळाला (infant) ब्रेस्टफिडिंग (Breastfeding) करून अशा व्हायरसपासून त्यांचा बचाव करता येऊ शकतो.

सामान्यपणे जेव्हा बाळ जन्माला येतं, तेव्हा त्यामध्ये व्हायरस नसतो, मात्र त्यानंतर त्याच्या आतड्यांमध्ये व्हायरस झपाट्याने वाढतात, ज्यामुळे त्याला पोटाचे आजार होण्याची शक्यता वाढते.  संशोधनात नवजात बालकाच्या मलाची तपासणी करण्यात आली, त्यावेळी सुरुवातीला त्यांच्या पोटात कोणतेही व्हायरस सापडले नाहीत मात्र एका महिन्यानंतर तब्बल 10 कोटी व्हायरस प्रति ग्राम सापडले. बाळ चार महिन्यांचं झाल्यानंतर हे व्हायरस  पेशींमध्ये वाढू लागतात आणि आजारी पाडतात.

ब्रेस्टफिडिंगमुळे (Breastfeeding) नवजात बाळांमधील (Infants) व्हायरसची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी होते, असं एका संशोधनात दिसून आलं आहे. नेचर जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. डेली मेलने याबाबत वृत्त दिलं आहे.

अगदी कमी प्रमाणाही आईचं दूध बाळाला जीवघेण्या व्हायरसची लढण्यासाठी सक्षम बनवतं. हे दूध बाळाच्या आतड्यांमध्ये व्हायरस जमा होण्यापासून रोखण्यात महत्त्वाची भूमिका निभावतं, असं या संशोधनात सांगण्यात आलं आहे.

या संशोधनाचे अभ्यासक फेड्रिक बुशमॅन यांनी सांगितलं, आम्ही केलेल्या अभ्यासानुसार हे समजण्यास मदत होईल की, काही मुलं आजारी का पडतात आणि एका महिन्यातच त्यांना असं संक्रमण होतं, ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात असतो.

जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफनेही नवजात बालकांना स्तनपान करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून बाळ निरोगी राहिल.

First published: April 19, 2020, 2:08 PM IST

ताज्या बातम्या