Ahmedabad: Senior Congress leader Sonia Gandhi addresses at the Congress Working Committee (CWC) meet, in Ahmedabad, Tuesday, March 12, 2019. (PTI Photo)(PTI3_12_2019_000157B)
नवी दिल्ली, 23 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरसचं महासंकट वेगानं पसरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात जवळपास अनेक उद्योगधंदे, व्यवसाय, कंपन्या बंद ठेवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे देशातील 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या आणि कामगारांवर गदा आली आणि पोट कसं भरायचा हा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे अशा कुटुंबियांना केंद्र सरकारनं 7500 रुपयांची मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. दरम्यान लॉकडाऊन संदर्भात बोलताना केंद्र सरकारवर टीकाही केली आहे. केंद्र सरकारनं अधिक गांभीर्यानं सर्व गोष्टी घेणं आवश्यक आहे. केवळ कामगारच नाही तर अनेक शेतकऱ्यांचं यामध्ये मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही. त्यामुळे सप्लाय चेनला अधिक चांगलं तयार करणं आवश्यक आहे. हे वाचा- किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत सस्पेन्स कायम, 6 वर्ष अशी सुरू होती सर्जरीची तयारी आमच्याकडून आम्ही केंद्र सरकारसाठी अनेक उपाययोजना सुचवल्या होत्या. त्यामध्ये टेस्टिंग किट आणि टेस्टिंग क्षमता वाढवण्यात यावी. रँडम टेस्टिंग व्हावं. असे काही बदल सूचवण्यात आले होते. मात्र अद्यापही या केंद्र सरकारकडून या गोष्टींची कमतरता भासत असल्याचं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. देशात बुधवारी रात्रीपर्यंत 1 हजार 486 नवीन रुग्ण आढळले होते. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 20 हजार 471 एवढी झाली आहे. तर मागच्या 24 तासांमध्ये 49 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूची संख्या 652 झाली आहे. हे वाचा- रोज पायी प्रवास… 30 रुपये पगार… रोहित शेट्टीच्या करिअरची अनटोल्ड स्टोरी संपादन- क्रांती कानेटकर