JOIN US
मराठी बातम्या / देश / देशभरात 24 तासांत 591 नवीन पॉझिटिव्ह केसेस, कोरोनाग्रस्तांचा आकडा 5,865 वर

देशभरात 24 तासांत 591 नवीन पॉझिटिव्ह केसेस, कोरोनाग्रस्तांचा आकडा 5,865 वर

477 रुग्णांनी या महासंकटाचा सामना यशस्वी केला असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 एप्रिल : कोरोनाग्रस्तांचा आकडा आतापर्यंत देशभरात 5 हजार 865 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 169 आहे. केंद्रीय आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत देशभरातून 591 नवीन लोकांच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर 20 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 477 रुग्णांनी या महासंकटाचा सामना यशस्वी केला असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्यानं वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. 14 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन असेल तर 11 किंवा 12 एप्रिल रोजी लॉकडाऊनसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर, कोरोनाच्या संसर्गाच्या बाबतीत देशामध्ये वाढत जाणाऱ्या संकटामुळे रक्तदान मोहिमेची शक्यता दूर करून, सुरक्षित रक्तदानासाठी केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक नियमावली जारी केली आहेत. हे वाचा- कोरोनाच्या धास्तीने महिलेच्या अंत्यसंस्काराला आला नाही एकही नातेवाईक, अखेर.. रक्तदानाची मोहीम चालू ठेवावी मात्र त्यात रक्त संकलन करताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. तो कोरोना रुग्ण किंवा कोरोनाचा बरा झालेला रुग्ण तर नाही ना? याची खातरजमा करायला हवी. कोरोनाचा संसर्ग झालेल्या किंवा परदेशातून आलेल्या किंवा कोरोनाची संशयित लक्षण असणारा व्यक्ती 28 दिवस रक्तदान करू शकणार नाही. रक्तदानावेळीही सोशल डिस्टंसिंग राखणं महत्त्वाचं आहे तसेच मास्क घालावा त्यामुळे कोरोनाचा धोका टळेल. देशातील सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. गुरुवारी राज्य आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 48 तासांत 25 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 229 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असून ती आता 1364 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या गुरुवारी सर्वाधिक ठरली. 9 एप्रिलला एकाच दिवसात 9 जणांचे मृत्यू झाले. त्यामुळे शहरात कोरोनाबळींची संख्या 54 झाली आहे. चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे दिवसभरात 79 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर ओपीडीमध्ये 403 जणांना संशयित रुग्ण म्हणून तपासून भरती करण्यात आले आहे. हे वाचा- भारतात इटलीसारखाच पसरत आहे कोरोना, तरीही देशासाठी आहे दिलासादायक बाब

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या