मुंबई, 24 एप्रिल : देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत एक हजार 684 कोरोनाच्या नव्या केसेस समोर आल्या आहेत. तर देशभरात 37 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा देशभरात आकडा 23 हजारवर पोहोचला आहे. त्यापैकी 17 हजार 610 जणांवर देशभरात उपचार सुरू आहेत. दिलासा देणारी बाब म्हणजे 4 हजार 749 रुग्ण बरे झाले असून त्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून घरी सोडलं आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.
हे वाचा- चीनच्या खोटारडेपणामुळं वाढल्या जगाच्या शंका, सर्वात धक्कादायक आकडेवारी आली समोर
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांमध्ये झापट्याने वाढ होत आहे. त्याबरोबर मृतांची संख्याही कमी होत नाही आहे. राज्यात गुरुवारी कोरोनाने 14 रुग्णांचा बळी घेतला आहे. तर 778 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 6427 झाली आहे. तर राज्यात आजपर्यंत एकूण 840 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. हे वाचा- एक नंबर! तुम्ही करून दाखवलं, लॉकडाऊनमुळे या 6 गोष्टींवर केली मात