चीनच्या खोटारडेपणामुळं वाढल्या जगाच्या शंका, आतापर्यंतची सर्वात धक्कादायक आकडेवारी आली समोर

चीनच्या खोटारडेपणामुळं वाढल्या जगाच्या शंका, आतापर्यंतची सर्वात धक्कादायक आकडेवारी आली समोर

एकीकडे कोरोनाबाबत चीन खोटी माहिती देत असताना आता वुहानमध्ये कोरोनामुळे मृत झालेल्या लोकांच्या आकडेवारीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • Share this:

बीजिंग, 24 एप्रिल : चीनच्या वुहानपासून कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली. दरम्यान चीनने कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचा दावा केला असला तरी, यात तथ्य नाही आहे. एकीकडे कोरोनाबाबत चीन खोटी माहिती देत असताना आता वुहानमध्ये कोरोनामुळे मृत झालेल्या लोकांच्या आकडेवारीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. वुहानमध्ये कोरोना विषाणूमुळे ठार झालेल्या लोकांच्या संख्येत अचानक 50 टक्के वाढ झाल्यापासून त्यांच्या अधिकृत आकडेवारीवर शंका वाढतच गेली आहे.

गेल्या आठवड्यात, चीनने मृतांच्या संख्येत वाढ करून रुग्णालयांमध्ये झालेल्या मृतांची नोंद केली नव्हती असे कारण पुढे केले होते. आता हाँगकाँगमधील संशोधकांनी एका अभ्यासानुसार असे म्हटले आहे की चीनमध्ये कोरोना विषाणूच्या पहिल्या लहरीचा संसर्ग 2, लाख 32 हजार 000 पेक्षा जास्त असू शकतो. ही संख्या अधिकृत आकड्यांपेक्षा चार पट जास्त आहे.

वाचा-एक नंबर! तुम्ही करून दाखवलं, लॉकडाऊनमुळे या 6 गोष्टींवर केली मात

चीनने 20 फेब्रुवारीपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गाची केवळ 55 हजार प्रकरणे समोर आल्याचे सांगितले होते. मात्र हाँगकाँग युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांचे म्हणणे आहे की जर सुरुवातीपासूनच चीनने सध्या वापरात येणाऱ्या उपाययोजना केल्या असत्या तर कोरोनाचा संसर्ग कमी झाला असता.

चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची सध्या 83,000 हून अधिक प्रकरणे आहेत. संपूर्ण जगात कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा 2 लाखांच्या आसपास आहे आणि तेथे 26 लाखाहून अधिक संसर्ग होण्याच्या घटना आहेत. सर्व देशांमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे चीनच्या आकडेवारीला मागे टाकत आहेत आणि अजूनही मृतांचा आकडा काही थांबत नाही आहे.

वाचा-वुहानमध्ये असं काय घडलं?जिथून कोरोना पसरला त्या शहराची काळी बाजू या 'डायरी'मध्ये

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने 15 जानेवारी ते 3 मार्च दरम्यान कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या सुमारे 7 वेगळ्या परिभाषा सांगितल्या. अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की परिभाषा बदलल्यामुळे संसर्गाच्या वास्तविक आणि अधिकृत प्रकरणांमध्ये मोठा फरक झाला आहे. हाँगकाँगच्या अभ्यासानुसार वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मिशनने वुहानमध्ये 20 फेब्रुवारी रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीचा समावेश आहे. या अभ्यासानुसार, चीन सरकारच्या सुरुवातीच्या चार बदलांमुळे आढळून आलेले केसेस आणि कोरोना संसर्गाची अधिकृत आकडेवारी यांच्यातील अंतर 2.8 वरून 7.1 पटीने वाढली आहे.

वाचा-चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा धोका, परदेशी नागरिकांमुळे प्रादुर्भाव वाढला

अभ्यासात असे म्हटले आहे की कोरोना संसर्गप्रकरणी चीनी सरकारने दिलेल्या उपाययोजना जर सुरूवातीपासूनच केल्या असता तर 20 फेब्रुवारीपर्यंत 2 लाख 32 हजार 000 प्रकरणे झाली असती. जी चीनच्या 55 हजार 508 च्या आकड्यांपेक्षा जवळपास चार पट जास्त असेल.

भारतासह संपूर्ण जगात 50 टक्के पेक्षा जास्त कोरोना विषाणूची लागण होण्याची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. या महिन्याच्या सुरूवातीस दक्षिण चायना मॉर्निंग पोस्टमध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात असे म्हटले गेले आहे की चीनमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या एक तृतीयांश लोकांनी विलंबित लक्षणे दर्शविली किंवा लक्षणे दर्शविली नाहीत. वृत्तानुसार, चीनमध्ये कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेमध्ये लक्षणे नसतानाही जास्त प्रकरणे आढळून आली आहेत.

संपादन-प्रियांका गावडे

First published: April 24, 2020, 8:56 AM IST

ताज्या बातम्या