नवी दिल्ली, 24 एप्रिल : लॉकडाऊनमुळे देशात कोरोना पसरण्याच्या वेगात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता आकडाही कमी होण्यास मदत होत आहे. सरकारने दावा केला आहे की, भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि डॅबलिंग रेट कमी झाला आहे. देशातील नामांकित डेटा विश्लेषक प्रोफेसर शामिका रवी यांच्या मते, लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी भारतातील कोरोनाची प्रकरणे दर चार दिवसांनी दुपटीने वाढत होती, आता ते 12 दिवसांत दुप्पट होत आहेत. शमिका रवी दावा यांनीही दावा केला आहे की जर लॉकडाउन झाले नसते तर 22 एप्रिलपर्यंत देशात कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या 5 लाख 23 हजार झाली असती, जी आता 21 हजार 700 झाली आहे. भारत कोरोनाला हरवणारच - 14 दिवसांत 78 जिल्ह्यांमध्ये नवीन प्रकरणे नाही - 291 जिल्ह्यांमध्ये अजून कोरोना पोहोचलाच नाही - फक्त 24 तासांत 388 लोक बरे झाले - कोरोना रोगापासून बरे होण्याचा दर 19.89 टक्के आहे - आतापर्यंत 4 हजार 257 रुग्ण बरे झाले - प्रसारण थांबविण्यात आणि डब्लिंग दर कमी करण्यात यशस्वी हिंदू प्रियकर अन् मुस्लीम प्रेयसी, आईवडिलांचा विरोध झुगारून केलं शुभमंगल! देशात कोरोना संक्रमणाची एकूण प्रकरणे 21700 झाली आहेत. एकूण 16689 सक्रिय रूग्ण आहेत तर आतापर्यंत 4324 बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरीदेखील पाठवण्यात आलं आहे. आतापर्यंत 686 लोक मरण पावले आहेत. तीन सर्वात जास्त संक्रमित राज्य म्हणजे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, गुजरात दुसर्या क्रमांकावर आणि दिल्ली तिसर्या क्रमांकावर आहे. कोणत्या राज्यात किती आहेत प्रकरणं? आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना व्हायरसमुळे संक्रमित सर्वाधिक 5,652 प्रकरणं महाराष्ट्रमध्ये आहेत. यानंतर गुजरातमध्ये 2,407, दिल्लीमध्ये 2,248, राजस्थानमध्ये 1,890, मध्य प्रदेशमध्ये 1,695 तमिलनाडुत1,629, उत्तर प्रदेशमध्ये1,509, तेलंगानात 960 आणि आंध्र प्रदेशमध्ये 895 प्रकरणं समोर आली आहेत. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा कोरोना संक्रमितांची संख्या 456, कर्नाटकमध्ये 443, केरलमध्ये 438, जम्मू-कश्मीरमध्ये 407, पंजाबमध्ये 277 आणि हरियाणामध्ये 262 झाली आहे. गौतम गंभीरने केला महिलेचा अंत्यसंस्कार, 6 वर्षांपासून करत होती घरी काम कोणत्या राज्यात किती मृत्यू झाले? कोविड -19 च्या संसर्गामुळे जीव गमावलेल्या एकूण 686 लोकांपैकी महाराष्ट्रात आतापर्यंत 686 मृत्यूची नोंद झाली आहे. त्यानंतर गुजरातमध्ये 103, मध्य प्रदेशात 81, दिल्लीत 48, राजस्थान आणि आंध्र प्रदेशात 27-27, तेलंगणामध्ये 24, उत्तर प्रदेशात 21, कर्नाटकात 17, पंजाबमध्ये 16 आणि पश्चिम बंगालमध्ये 15 जण आहेत. या प्राणघातक रोगामुळे जम्मू-काश्मीरमध्ये 5 तर केरळ, झारखंड आणि हरियाणामध्ये 3 मृत्यू झाले आहेत. बिहारमध्ये 2 मृत्यू, मेघालय, हिमाचल प्रदेश, ओडिशा आणि आसाममध्ये प्रत्येकी 1 मृत्यू झाला आहे. वुहानमध्ये असं काय घडलं?जिथून कोरोना पसरला त्या शहराची काळी बाजू या ‘डायरी’मध्ये संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.