प्रातिनिधिक फोटो
नवी दिल्ली, 18 एप्रिल : जग सध्या कोरोनाशी लढा देत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनही करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर देशात कोरोनाला रोखण्यासाठी दवाखान्यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि बाहेर रस्त्यावर पोलीस कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत.कुटुंबापासून दूर राहून त्यांना हे काम करावं लागत आहे. तरीही त्यांच्यावर हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान, अशाच एका महिला पोलीस उपनिरिक्षकाने दिलेलं उत्तर त्यांच्या वेदना . लॉकडाऊन असतानाही घराबाहेर पडणाऱ्या लोकांना पोलीस कर्मचारी घरीच बसण्याचं आवाहन करत आहेत. प्रसंगी त्यांनाही कठोर भूमिका घ्यावी लागते. त्यावर लोकांकडून उद्धट बोलणीही पोलिसांना ऐकावी लागतात. याचाच अनुभव नोएडातील सेक्टर 20 ठाण्याच्या पोलीस उपनिरिक्षक उशा कुशवाह यांनी सांगितला आहे. आज तकशी बोलताना त्या म्हणाल्या की, कडक उन्हात तोंडावर मास्क बांधून ड्युटी करत असताना दररोज घरच्या लोकांची आठवण येते. पोलीस ठाण्यातून घरी जायला तासही लागत नाही पण तरीही त्यांना भेटू शकत नाही. याआधी दोन आठवड्यापेक्षा जास्त कधीच त्यांना न भेटता राहिले नाही पण आता महिना झाला कोणालाच पाहिलं नाही. उषा कुशवाह सांगतात की, ‘घरचे लोक भेटायला ये म्हणत आहेत पण मीच जात नाही. मला भीती वाटते की माझ्यामुळे ते धोक्यात नको यायला. म्हणूनच एकटी राहते. पण वाईट याचं वाटतं जेव्हा लोक लॉकडाऊन तोडतात आणि आमच्याशी उद्धटपणे बोलतात.’ लोकांकडून केल्या जाणाऱ्या अरेरावीबद्दल उषा यांनी एक घटना सांगितली. त्या म्हणतात, ‘मार्चमध्ये जेव्हा लॉकाडऊन नुकताच सुरू झाला होता. त्यावेळी झोपडपट्टीतील लोकांसाठी राशन वाटपाचे काम सुरू होते. तेव्हा महिलांची गर्दी जास्त होती. धान्य संपल्यावर ज्यांना मिळालं नाही त्यांनी दगडफेक सुरू केली. शिव्याही द्यायला सुरू केल्या. शेवटी जादा पोलिसांची कुमक बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणली.’ हे वाचा : कोरोनामुळे ही मोठी कंपनी 2025पर्यंत वर्क फ्रॉम होम सुरू ठेवण्याच्या विचारात एकच अशी घटना नाही तर अनेकदा असं झालं आहे. लोक काही कारण नसताना लॉकडाऊन तोडतात आणि तेव्हा त्यांना हटकलं तर पोलिसांनाच दमदाटी करायचा प्रयत्न करतात. अशा लोकांना उषा कुशवाह यांनी एक आवाहन केलं आहे.‘तुम्ही विचार करायला हवा. आम्ही जे काही करतोय ते जनतेच्या सुरक्षेसाठी आणि आमचं कर्तव्य म्हणून करत आहे. आम्हीसुद्धा घरच्या लोकांना महिन्याभरापासून भेटलो नाही. आमच्याशी उद्धटपणे वागण्याआधी एकदा हासुद्धा विचार करा की आम्हीसुद्धा अशाच वातावरणात राहतो.‘असंही उषा कुशवाह म्हणाल्या. हे वाचा : माणुसकीचा पाझर, हात नसलेल्या माकडाला पोलीस अधिकारी भरवतोय केळ, VIDEO VIRAL