JOIN US
मराठी बातम्या / देश / Unlock 1 नंतर कोरोनाची रेकॉर्ड ब्रेक आकडेवारी, 24 तासांत 10,956 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

Unlock 1 नंतर कोरोनाची रेकॉर्ड ब्रेक आकडेवारी, 24 तासांत 10,956 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

24 तासांत 396 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 8498 वर पोहोचला आहे.

जाहिरात

दिल्लीमध्ये कोरोना बाधित रुग्णाची केस पहिल्यांदा 2 मार्चला समोर आली होती. कोरोना बाधित रुग्ण हा इटलीतून आला होता.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 जून : देशभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस रेकॉर्ड ब्रेक रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. Unlock 1 च्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगानं वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात नवीन 10 हजारहून अधिक लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. 24 तासांत देशात 10 हजारहून अधिक नवीन कोरोनाचे रुग्ण मिळाल्यानं कोरोनाग्रस्तांचा आकडा 2, 97,535 हजारवर पोहोचला आहे. 24 तासांत 396 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 8498 वर पोहोचला आहे. तर 1, 47, 195 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात दिली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या संसर्गातून बरे होणाऱ्यांची टक्केवारी जवळपास 49.47 टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण दिल्ली आणि महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकाडा आतापर्यंत 97 हजार 648 वर पोहोचला आहे. त्यापैकी 46 हजार 78 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या आहे. त्याखालोखाल तमिळनाडू, गुजरात, दिल्ली राज्यांचा समावेश आहे. हे वाचा- अमानवी कृत्य! 14 मृतदेहांसोबत असं कुणी करत का? कर्मचाऱ्यांचा धक्कादायक VIDEO हे वाचा- …म्हणून 103 वर्षीय डॉक्टरनं घेतला 42.2 किमी पायी चालण्याचा निर्णय संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या