कोलकाता, 12 जून : देशभरात कोरोनाची दहशत अनेक भागांमध्ये आहे. अशाच स्थितीत एक भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह फरफटत नेल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता इथली घटना आहे. रुग्णालयातील मृतदेह महापालिकेच्या गाडीतून अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाताना कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ समोर आला आहे.
बुधवारी ही घटना गारिया स्मशानभूमीत घडली. त्यासंदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने त्याचा तीव्र निषेध केला जात आहे. या व्हिडीओची सत्यता अद्याप तपासण्यात आली नाही. मात्र हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
ये अमानवीयता की हद है। किसी की मृत देह को ममताजी आपके राज में जिस तरह घसीटकर गाड़ी में पटका जा रहा है, वो असहनीय है। क्या सरकार इस बात की जवाबदेह नहीं है कि ये कृत्य क्यों किया गया।
— Kailash Vijayvargiya (@KailashOnline) June 11, 2020
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांनी एक एक मृतदेह फरफटत स्मशानभूमीत नेले. हे मृतदेह कोरोना संक्रमित रुग्णाचे असू शकतात अशी शंकाही व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेता नागरिकांनी मोठ्या संख्येनं या घटनेचा निषेध करून आंदोलन केलं.
पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत त्यांनी स्थानिक नागरिकांची समजूत काढली. लोकांनी आंदोलन केल्यानं कर्मचाही हे 14 मृतदेह पुन्हा गाडीत घालून रुग्णालयात घेऊन गेले. हे मृतदेह एनआरएस मेडिकल कॉलेज रुग्णालयातील असल्याचं समोर आल्यानंतर रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी लोकांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र या अमानवीय कृत्याचा सोशल मीडियावर निषेध केला जात आहे.