ब्रसेल्स, 12 जून : जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या कोरोनाबांधितांचा आकडा 74 लाखांपर्यंत गेला आहे. दरम्यान अद्याप लस शोधण्यात कोणत्याही देशाला यश आलेलं नाही आहे. यातच एक 103 वर्षांचे डॉक्टर सध्या वॉकिंग मॅरेथॉन करत आहे. 1 जूनपासून या डॉक्टरांनी चालण्यास सुरुवात केली आहे, ते 30 जूनपर्यंत चालणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 103 वर्षीय डॉक्टर चालत का आहेत? याचे कारण आहे कोरोनाची लस.
या डॉक्टरांनी कोरोना लशीच्या संशोधनासाठी चालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते एक महिना वॉकिंग मॅरेथॉन करणार आहेत. रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार, 103 वर्षांचे हे डॉक्टर बेल्जियमचे आहेत. ते आपल्या बागेत रोज 42.5 किमी चालतात. यासाठी ते 1 जूनपासून रोज 10 लॅप्स पूर्ण करतात. 30 जूनपर्यंत त्यांनी चालण्याचा निर्णय घेतला आहे.
वाचा-दुडूदुडू धावणाऱ्या गोंडस मुलाचा हा VIDEO नीट पाहा, काळजाचा चुकेल ठोकाकाय आहे कल्पना?
अॅल्फन्स असे या डॉक्टरांचे नाव असून त्यांना ही कल्पना दुसऱ्या महायुद्धातून आली. त्यावेळी दोन ज्येष्ठ स्वत:च्या बागेत फिरून ब्रिटनच्या आरोग्यासाठी निधी जोडत होते. अॅल्फन्स यांनी सांगितले की, "माझ्या मुलांनी मला ही कल्पना दिली. मी फिट असून, मला चालताना काहीच त्रास होत नाही. त्यांच्या आधी त्यांच्या नातीनं अशी मॅरेथॉन पूर्ण केली होती. त्यावरून अॅल्फन्स यांना ही कल्पना आली.
वाचा-OMG! विमानावर कोसळली वीज आणि... अंगावर काटा आणणारा VIDEOआतापर्यंत जमा केले 6000 यूरो
अॅल्फन्स यांनी सांगितली की, 1957-58मध्ये आशियाई देशांमध्ये जेव्हा फ्लू आला होता. मात्र त्यापेक्षा कोरोना भयंकर नसल्याचं त्यांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर 11 दिवसांत अॅल्फन्सयांनी 6000 यूरो म्हणजेच 5 लाख 17 हजार 065 रुपये जमवले आहेत.
वाचा-इंग्लिश स्पीकिंग क्लासचे भन्नाट पोस्टर वाचून आवरणार नाही हसू, PHOTOS VIRAL
संपादन, संकलन-प्रियांका गावडे.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.