शहरात सध्या 703 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 437 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
मुंबई, 22 एप्रिल : देशात कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस सुरूच आहे. कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 15 तासांमध्ये कोरोनामुळे 37 जणांचा मृत्यू झाला असला तरीही दिलासा देणारी बाब म्हणजे 610 जणांनी कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वीपणे दिला आहे. सध्या देशात 15 हजार 474 रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत देशात एकूण 19 हजार 984 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे त्यापैकी 3 हजार 869 रुग्णांनी कोरोनाविरुद्ध यशस्वी लढा दिला आहे. त्यांच्यावरील उपचारांना यश मिळालं असून या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. तर हॉटस्पॉट असणाऱ्या अनेक शहरांमध्ये प्रशासनाकडून कठोर नियम पाळले जात आहे.
हे वाचा- लॉकडाऊनचा कंटाळा बघा! बोअर झाला म्हणून 15 कोटी कमवणारा अवलिया झाला डिलिव्हरी बॉय
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी तेलंगणानं 7 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. तर दुसरीकडे दिल्ली-नोएडा सीमा सील करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत मंगळवारी 419 कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 5000 पार गेला आहे. महाराष्ट्रात मुंबई- पुणे भागात लॉकडाऊन असूनही रुग्णसंख्या कमी होत नाही. लोक निर्बंध नियम पाळत नसल्याचं लक्षात आल्यामुळे अपेक्षित लॉकडाऊन सवलती देता येणार नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरू केल्याने शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. संपादन- क्रांती कानेटकर हे वाचा- प्रसिद्ध इंग्लिश गाणं गातोय भिकारी, सोशल मीडियावर VIDEO चा धुमाकूळ