दोन-अडीच मिनिटांचा हा व्हिडिओ वंदना जयराजन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये भिकारी जिम रिव्सचं प्रसिद्ध गाणं 'He'll Have to Go' गात असताना दिसते. जिम रिव्स या अमेरिकन गायकाने हे गाणं 1959 मध्ये गायलं होतं. 1960 च्या दशकात हे गाणं प्रचंड लोकप्रिय होतं. हे वाचा : TikTok वर आतापर्यंतचा सर्वात डेंजर VIDEO, युजर्सही प्रचंड घाबरले व्हिडिओ शूट करणाऱ्याने भिकाऱ्यासोबत संवादही साधला आहे. यात इंग्लिशमधून काही प्रश्न विचारले त्यावर उत्तरही दिलं. भिकाऱ्याला विचारलं की, दररोज जगण्यासाठी तु काय करतोस असा प्रश्न विचारला त्यावर भिकाऱ्यानं क्षणार्धात मी भीक मागतो असं उत्तर दिलं. याशिवाय त्याला जेवणाबद्दल विचारलं तर सध्याच्या कठीण परिस्थितीतही काहीच तक्रार त्याने केली नाही. तो म्हणाला की जे काही देव मला देतो त्यात मी आनंदी आहे. मी एक गायक आणि डान्सर आहे. माझं नाव सनी बाबा आहे. हे वाचा : लॉकडाऊनमध्ये घरातलं तांदूळ संपलं म्हणून जंगलातून किंग कोब्रा मारून आणला संपादन - सूरज यादवThis man, a beggar from Patna sings Jim Reeves "He'll have to go". Priceless ❤️ pic.twitter.com/lJdoRjrxMa
— Vandana (@VandanaJayrajan) April 20, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.