JOIN US
मराठी बातम्या / देश / कोरोनाग्रस्तांची सेवा करताना मृत्यू, डॉक्टरची अखेरची इच्छाही जमावाने होऊ दिली नाही पूर्ण

कोरोनाग्रस्तांची सेवा करताना मृत्यू, डॉक्टरची अखेरची इच्छाही जमावाने होऊ दिली नाही पूर्ण

कोरोनाची सेवा करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूआधी एक व्हिडिओ मेसेज रेकॉर्ड करून अंतिम इच्छा व्यक्त केली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चेन्नई, 22 एप्रिल : देशात कोरोनाला रोखण्यासाठी डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी जीवाची पर्वा न करता झटत आहेत. मात्र त्यांच्यावर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. चेन्नईमध्ये एका न्यूरो सर्जनचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तेव्हा डॉक्टरांच्या अंत्यसंस्कारासाठी काही लोक आले होते त्यांच्यावर जमावाने हल्ला केला. त्यामुळे मृतदेह कब्रस्तानात सोडून त्यांना पळावं लागलं. इतकंच काय डॉक्टरांची पत्नी आणि मुलंसुद्धा अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहू शकली नाहीत. पत्नीने सांगितलं की, मृत्यू आधी डॉक्टरांनी व्हिडिओ मेसेज रेकॉर्ड करून अंतिम इच्छा व्यक्त केली होती. त्यात म्हणाले होते की, जर मी वाचलो नाही तर माझे अंत्यसंस्कार विधीवत कऱण्यात यावेत. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्याकडे डॉक्टरांच्या पत्नीने हात जोडून याबाबत विनंती केली. कोरोनाची भीती लोकांच्या मनात असल्यानं कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या मृतदेहावर त्यांच्या भागात अंत्यसंस्कार झाल्यास कोरोना पसरेल असं वाटलं. या वातावरणातच अॅम्ब्युलन्समधून मृतदेह कब्रस्तानात आणण्यात आला. तर तिथं जमावाने अॅम्ब्युलन्सच्या काचा तोडल्या. विटा, दगड, बाटल्या आणि काठी घेऊन लोकांनी हल्ला केला आणि अंत्यसंस्कार कऱणाऱ्यांना तिथून पळवून लावलं. शेवटी डॉक्टर प्रदीप कुमार यांनी जीव धोक्यात घालून आपल्या सहकाऱ्यावर अंत्यसंस्कार केले. त्यांनी सांगितल की, दफन करण्यासाठी खड्डा खणायला सुरुवात केली तोवर 60-70 लोकांनी आमच्यावर हल्ला केला. त्यामध्ये अॅम्ब्युलन्समधून मृतदेह बाहेर काढणाऱे कर्मचारी यामध्ये जखमी झाले. त्यानंतर आम्ही कसेबसे तिथून मृतदेह घेऊन रुग्णालयात आलो. तिथं येऊम पीपीई किट घेतलं आणि दोन कर्मचाऱी आणि पोलिसांना घेऊन पुन्हा कब्रस्तानात पोहोचलो. हे वाचा : अमेरिकेत उद्योग सुरू होणार, 45 हजार मृत्यू झाले असतानाच ट्रम्प यांची मोठ घोषणा कब्रस्तानात आल्यावर आम्ही मृतदेह लगेच दफन केला. आम्हाला भीती होती की पुन्हा हल्ला होईल. दफन करताना आमच्याकडे एकच फावडं होतं. इतर दोघांनी हाताने माती ढकलून तो 8-10 फुटांचा खड्डा भरला अशी माहिती डॉक्टर प्रदीप कुमार यांनी दिली. कोरोनाविरुद्धच्या लढाईत अनेक ठिकाणी डॉक्टरांवर हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर Indian Medical Association म्हणजेच IMA या डॉक्टरांच्या संघटनेनेनं आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत केंद्र सरकारने  तातडीने पावलं टाकत डॉक्टर्स आणि इतर मेडिकल स्टाफवर हल्ला केल्यास कडक शिक्षेची तरदूत असणारा अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. हे वाचा : कोरोनाच्या लढ्यात यश! एकाच कुटुंबातील 6 जणं बरे होऊन परतले घरी, पुन्हा शतकपूर्ती

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या