दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांंनी चीनबरोबर सर्व ट्रेड डील संपवून टाकण्याची धमकी दिली आहे. जर कोरोना व्हायरसचा जगभरात प्रसरण करण्यात चीन दोषी आढळला तर याचे परिणाम चीनला भोगावे लागतील अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. कोरोना व्हायरस संक्रमित झालेल्यांचा चीनमधील आकडा 82 हजार 788 आहे तर मृतांची संख्या 4,632 इतकी आहे. मात्र अमेरिकेमध्ये ही संख्या कित्येक पटींनी अधिक आहे. अमेरिकेमध्ये कोरोनाबाधित झालेल्यांची एकूण संख्या 8,24,600 एवढी आहे. तर आतापर्यंत 45,290 जणांचा मृत्यू झाला आहे. COVID-19 मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या अमेरिकेमध्ये सर्वाधिक आहे. (हे वाचा-'जर हे खरं असेल तर...', किम यांच्या प्रकृतीबाबत ट्रम्प यांनी दिली प्रतिक्रीया) डोनाल्ड ट्रम्प यांनी साल 2018 मध्ये चीनबरोबर ट्रेडवॉर सुरू केले होते. त्यानंतर अमेरिका आणि चीनमध्ये ट्रे़डवॉर वाढलं. अमेरिकेने चिनी वस्तूंवरील टेरिफ शूल्क वाढवले, त्याला उत्तर म्हणून चीनने देखील टेरिफ शूल्क वाढवले होते. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापारामध्ये कटूता निर्माण झाली होती. दोन्ही देश माघार घेण्यासाठी तयार नव्हते. शेवटी जानेवारीमध्ये दोन्ही देशांनी व्यापारात निर्माण झालेली कटूता विसरत पहिल्या टप्प्यातील ट्रेड डीलवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ज्यामुळे अर्थव्यवस्था रुळावर आणण्यास मदत झाली आहे.States are safely coming back. Our Country is starting to OPEN FOR BUSINESS again. Special care is, and always will be, given to our beloved seniors (except me!). Their lives will be better than ever...WE LOVE YOU ALL!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) April 22, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus