मुंबई, 12 एप्रिल : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) फैलाव झपाट्याने वाढत असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोनाचा (Covid - 19) फैलाव रोखण्यासाठी अनेक राज्यांमधील लॉकडाऊनची मर्यादा वाढविण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार भारतात अवघ्या 4 दिवसात 80 नव्या जिल्ह्यांमध्ये कोरोना पोहोचला आहे. यापूर्वी 8 एप्रिलपर्यंत 284 जिल्ह्यांमधील संसर्गाची प्रकरण समोर आली होती. आता त्यात वाढ झाली असून ही संख्या 364 पर्यंत पोहोचली आहे. आज दिल्लीत (Delhi) 85 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून आज 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसर आता दिल्लीतील कोरोनाबाधितांचा आकडा 1154 पर्यंत पोहोचला आहे आणि मृतांची संख्या 24 पर्यंत पोहोचली आहे. दुसरीकडे मुंबईत (Mumbai) 217 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली असून 16 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय आतापर्यंत येथे 1399 कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला असून मृतांची संख्या 97 इतकी आहे. तर आतापर्यंत 97 जणं बरे होऊन घरी गेले आहेत. गुजरातमध्ये (Gujrat) आज 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून आतापर्यंत येथे 24 जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये (Bihar) आतापर्यंत 64 जणांना कोरोनाची लागण झाली असून आज एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत येथे 26 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुसरीकडे उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) सलग चौथ्या दिवशी एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नाही. सध्या येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आकडा 35 इतका आहे. संबंधित कोरोनाचा विळखा! राज्यात आज 22 जणं दगावले, एकूण रुग्णसंख्या 1982 वर ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोनाला हरवलं, रुग्णालयातून डिस्चार्ज