लंडन, 12 एप्रिल : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांची प्रकृतीत सुधार आल्याने त्यांना आज (12 एप्रिल) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. बोरिस यांना सोमवारी (6 एप्रिल) आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. बोरिस जॉन्सन यांना 10 दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केले होते.
अखेर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र असे असले तरी ते लगेच कामात रुजू होऊ शकत नाही. त्यांना पुढील काही दिवस सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. फॉरेन सेक्रेटरी डॉमिनिक रॅब यांनी नागरिकांना घरात राहण्याचं आवाहन केलं आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रुग्णालयात दिलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल बोरिस यांनी धन्यवाद व्यक्त केले आहे.
UK Prime Minister Boris Johnson discharged from hospital reports AFP quoting Downing Street (File pic) pic.twitter.com/dVng9V6zys
— ANI (@ANI) April 12, 2020
बोरिस यांना काही काळ ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. याआधी बोरिस यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते, याबाबत त्यांनी स्वतः ट्वीट करून माहिती दिली होती. मुख्य म्हणजे पंतप्रधान बोरिस जॉन्सन रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी पंतप्रधानांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी यासाठी परराष्ट्रमंत्री डोमॅनिक रॉब यांना पंतप्रधानपदाची कामे पार पाडण्यासाठी नियुक्त केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india