मुंबई, 12 एप्रिल : देशभरात कोरोना (Covid - 19) विळखा वाढत असून राज्यातील कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आज राज्यात एकूण 221 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली असून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात तब्बल 1982 जणांना कोरोनाची लागण झाली असून आज तब्बल 221 नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती समोर आली आहे.
मृतांची संख्या मुंबई – 16 पुणे – 3 नवी मुंबई – 2 सोलापूर – 1 मृतांमध्ये 13 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. यापैकी 6 जणांचे वय 60 हून अधिक असून 15 जणांचे वय 40 ते 60 या वयोगटातील आहेत. मृतांपैकी 1 जण 40 वर्षांचा आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा आणि ह्रदयरोग असल्याचे आढळून आले आहे. राज्यातील कोरोनाची संख्या वाढत असली तरी आज राज्यातील 217 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. संबंधित - पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा पहिला बळी, एकूण बाधितांची संख्या 31 वर पुण्यात कोरोना बळावतोय! 8 तासांत 15 नवे रुग्ण, मृतांचा आकडा 30 वर