JOIN US
मराठी बातम्या / देश / धारावीतील बालिका नगर कोरोनाचा हॉटस्पॉट! नवीन 2 रुग्णांची नोंद, एकूण संख्या 4 वर

धारावीतील बालिका नगर कोरोनाचा हॉटस्पॉट! नवीन 2 रुग्णांची नोंद, एकूण संख्या 4 वर

तबलिगी कार्यक्रमात सहभागी झालेल्या पाच व्यक्ती 19 मार्च ते 22 मार्च या दरम्यान या भागात वास्तव्यास होत्या अशी माहिती समोर आली आहे

जाहिरात

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेली धारावी आता कोरोनाचा हॉटस्पॉट बनली आहे. त्यामुळे आता या भागात कोरोनाचं संक्रमण रोखणं मोठं आव्हान आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 एप्रिल : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत (Dharavi) दोन दिवसांपूर्वी कोरोना (Covid -19) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. त्यातच एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज धारावीत आणखी दोन कोरोनाग्रस्त (Coronavirus) रुग्ण आढळून आले आहेत. सध्या धारावीतील पॉझिटिव रुग्णांची संख्या आता 4 वर पोहोचली आहे. धारावीतील बलिगा नगरमध्येच एक 30 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे आणि मुकुंदनगर चाळीतील एक 48 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला आहे. हे दोघेही रुग्ण सध्या सायन रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. मुकुंद नगरमधील हायरिस्क असलेल्या सगळ्यांना धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये विलगीकरण कक्षात ठेवलं जाणार आहे. सध्या धारावीत एकूण 4 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. संबंधित -  कोरोना रुग्णांवर उपचारासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती परिचारिकेचा 250 किमीचा प्रवास बलिका नगरला आता हॉटस्पॉट मानून तिथे कॅम्प लावला जाणार आहे. ज्यात ताप सर्दी असलेल्या सगळ्या लोकांचे थुंकीचे नमुने घेतले जाणार आहेत. विशेष म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तबलिगी कार्यक्रमात सहभागी झालेल्या पाच व्यक्ती 19 मार्च ते 22 मार्च या दरम्यान या भागात वास्तव्यास होत्या. त्यामुळे बलिगानगरकडे एक अतिसंशयित भाग म्हणून पाहिला जात आहे. तिथे जेवणापासून सगळ्या गोष्टी पालिका पुरवत आहे. कुणालाही घराबाहेर जाऊ दिलं जात नाही. अगदी सॅनिटरी नॅपकिनदेखील पालिकेकडून पुरवलं जात आहे. दोन दिवसांपूर्वी धारावीतील एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. तब्बल 9 दिवस तो व्यक्ती सायन रुग्णालयात उपचार घेत होता. 1 एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर धारावीत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच तबलिगी कार्यक्रमात सहभागी झालेले काहीजणांनी धारावीचा दौरा केल्याची माहिती उघड झाल्यानंतर येथे अधिक काळजी घेतली जात आहे. संबंधित -  कोरोनाची भयावह स्थिती असताना मुंबईतील रुग्णालयातून धक्कादायक प्रकार समोर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या