जाहिरात
मराठी बातम्या / देश / प्रेरणादायी! कोरोना रुग्णांवर उपचारासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती परिचारिकेचा 250 किमीचा प्रवास

प्रेरणादायी! कोरोना रुग्णांवर उपचारासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती परिचारिकेचा 250 किमीचा प्रवास

प्रेरणादायी! कोरोना रुग्णांवर उपचारासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती परिचारिकेचा 250 किमीचा प्रवास

या परिचारिकांसारखं काम करणाऱे वैद्यकीय कर्मचारी असल्याने देशात कोरोना बरा होणारी रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

चेन्नई, 4 एप्रिल : कोरोनाच्या (Covid - 19) पार्श्वभूमीवर देशभरात भीतीचं वातावरण आहे. यादरम्यान डॉक्टर, परिचारिका, पोलीस अधिकारी, स्वच्छता कर्मचारी जीवाची पर्वा न करता नागरिकांची सेवा करीत आहेत. यातच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. ती वाचून तुम्हालाही त्या परिचारिकेविषयी कौतुक वाटेल. सर्वसामान्य नागरिकांना कोरोनापासून वाचविण्यासाठी काम करणाऱ्या यासर्वांचं काम खूप मोठं आहे. तामिळनाडूतील एक परिचारिकेने  कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी 250 किलोमीटरचा प्रवास करीत रुग्णालयात पोहोचली. विशेष बाब म्हणजे 8 महिन्यांची गर्भवती असताना तिने केवळ रुग्णांना सेवा देण्यासाठी तब्बल 250 किमीचा इतका लांब प्रवास करुन रुग्णालयात दाखल झाली. संबंधित -  14 एप्रिलनंंतर लॉकडाऊन हटवणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा खुलासा या नर्सचं नाव विनोथिनी आहे. ती 8 महिन्यांची गर्भवती आहे. ती 25 वर्षांची आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी तिने तामिळनाडूतील तिरुचिरा ते रामनाथुरमपर्यंत तब्बल 250 किमी अंतर प्रवास केला. आतापर्यंत या लढाईत अनेकांनी साथ दिली आहे. देश एकजूट होऊन कोरोना (Coronavirus) या संकटाशी लढा देत आहे. या परिचारिकांसारखं काम करणाऱे वैद्यकीय कर्मचारी असल्याने देशात कोरोना बरा होणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार विनोथिनी ही तिरुचि येथे एका खासगी रुग्णालयात काम करीत होती. 1 एप्रिल रोजी रामनाथपुरम येथील स्वास्थ सेवा संयुक्त निर्देशक यांचा कॉल आला. कोरोना रुग्णांवर उपचारासंदर्भात तो कॉल होता. त्यानंतर विनोथिनीने फार वेळ न दवडता प्राथमिक स्वास्थ रुग्णांची मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रवास करुन ती त्या रुग्णालयात पोहोचली. संबंधित -  तबलिगीमुळे लॉकडाऊनच्या काळात वाढला धोका, कोणकोणत्या राज्यांमध्ये पसरला कोरोना?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात