नवी दिल्ली, 20 सप्टेंबर: लोकसभेत मंजूर करण्यात आलेली तीन वादग्रस्त कृषी विधेयके मोदी सरकार रविवारी राज्यसभेत मांडणार आहे. राज्यसभेत ते मंजूर झाल्यास शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा आंदोलन भडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. हेही वाचा.. निवडणूक प्रतिज्ञापत्रामुळे उद्धव ठाकरेंसह आदित्य व सुप्रिया सुळेंच्या अडचणीत वाढ देशातील शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. मात्र, भारतीय जनता मोदी सरकारचा हा डाव कधी यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये ‘किसान विरोधी नरेंद्र मोदी’ (#KisanVirodhiNarendraModi)असा हॅशटॅग वापरला आहे. मोदी सरकारचा कृषीविरोधी ‘काळा कायदा’ देशातील शेतकऱ्यांसाठी घातक आहे. कृषी उत्पन्न बाजार पेठा बंद झाल्यानंतर MSP कसे मिळणार? MSPची हमी मोदी सरकार का देत नाही? असे सवाल देखील राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत.
राहुल गांधी यांनी यापूर्वी कृषी विधेयकावरून सरकारवर निशाणा साधला होता. ‘शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरून विश्वास उडाला आहे. मोदी यांच्या बोलण्यात आणि कृती करण्यात फरक आहे. नोटबंदी, चुकीचा जीएसटी आणि डिझेलवरती प्रचंड कर हे यावरून सिद्ध झालं आहे. कृषी विधेयकामुळे मोदी सरकार आपल्या मित्रांचा व्यापार वाढवणार आणि शेतकऱ्यांच्या रोजी रोटीवर हल्ला करणार आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. दुसरीकडे, राज्यसभेत ते मंजूर झाल्यास शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा आंदोलन भडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस अलर्टवर असून दिल्ली-हरयाणा सीमेवरील अशोक नगर-गाझिपूर भागात अधिक पोलीस कुमक पावठण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी त्यापूर्वी कृषी विधेयकावरून सरकारवर निशाणा साधत ट्विट केलं होतं. “शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरून विश्वास उडाला आहे. कारण सुरूवातीपासून मोदीजींच्या बोलण्यात आणि कृतीत फरक राहिला आहे. नोटबंदी, चुकीचा जीएसटी आणि डिझेडवरती प्रचंड कर. सजग शेतकऱ्याला माहिती आहे की, कृषी विधेयकामुळे मोदी सरकार आपल्या मित्रांचा व्यापार वाढवणार आणि शेतकऱ्यांच्या रोजी रोटीवर हल्ला करणार आहे,” अशा शब्दात राहुल गांधी यांनी टीका केली आहे.
भारतीय राष्ट्रवाद क्रौर्य, हिंसेचं समर्थन करू शकत नाही… राहुल गांधी हे गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्यानं टीका करत आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनी ‘धरोहर’ मालिकेचा 11 वा भाग शेअर केला होता. ‘स्वराज्य आणि राष्ट्रवादाचा थेट संबंध अहिंसेशी आहे. भारतीय राष्ट्रवाद कधीही क्रौर्य, हिंसा आणि धार्मिक वादाला साथ देऊ शकत नाही,’ असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.