33 केव्ही तारेच्या स्पर्शाने या मुलीच्या शरीराचा 60 टक्के भाग भाजला आहे.
अनुप पासवान, प्रतिनिधी कोरबा, 24 जुलै : कोकणात मुसळधार पाऊस झाला असला, तरी राज्याच्या काही भागांमध्ये मात्र अद्यापही पावसाने हवी तशी हजेरी लावलेली नाहीये. तर इतर काही राज्यांमध्येही जोरदार पाऊस झालाय. अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. अशातच पावसामुळे विविध दुर्घटनाही समोर येत आहेत. छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात गच्चीवर खेळता खेळता एक 12 वर्षीय मुलगी विद्युत तारेच्या संपर्कात आली आणि गंभीर जखमी झाली. 33 केव्ही तारेच्या स्पर्शाने या मुलीच्या शरीराचा 60 टक्के भाग भाजला आहे. सृष्टी पटेल असं तिचं नाव असून कोरबा जिल्ह्यातील परशुराम भावनाजवळ ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर सृष्टीला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवाने तिचा जीव वाचला असून सध्या मेडिकल कॉलेज जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. आता तिची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.
महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यात स्वतःची काळजी घ्या, विद्युत तारा आणि खांबांपासून दूर राहा, असं आवाहन वारंवार करण्यात येतं. मात्र सृष्टीला ज्या तारेचा स्पर्श झाला ती तार फारच खाली होती, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच गावकऱ्यांनी या घटनेनंतर विद्युत वितरण कंपनीविरोधात रोष व्यक्त केला. विद्युत वितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सापांचे फोटो, व्हिडिओ काढण्याचं धाडस करू नका! तुमच्यावर होईल कायदेशीर कारवाई ‘आम्ही या तारेबाबत वारंवार विद्युत वितरण कंपनीकडे तक्रार केली होती. इतर विद्युत तारींच्या तुलनेत ही तार खूप खाली होती, त्यामुळे अशी काही दुर्घटना घडू नये एवढीच आमची इच्छा होती. मात्र वितरण कंपनीने आमचं म्हणणं कधी गांभीर्याने घेतलं नाही आणि आता नको ते घडलं. एक लहान मुलगी आज मृत्यूशी झुंज देत आहे’, असा तीव्र संताप गावकऱ्यांनी व्यक्त केला.