चेन्नई, 16 मे : तामिळनाडूच्या कमलाथल अम्मा या गेल्या 30 ते 35 वर्षांपासून फक्त एका रुपयात इडली विकत आहेत. लोकांचे पोट भरलं पाहिजे एवढीच त्यांची इच्छा आहे. आता लॉकडाऊन असतानाही त्या एक रुपयामध्ये इडली देत आहेत. लोकांना इडली पोहोचवणं आणि खायला घालण्याचं काम सुरूच आहे. अम्मांच्या या कामाची माहिती सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना यांना समजली. तेव्हा त्यांनी अम्माला मदत केली आहे. विकास खन्ना यांनी ट्वीटरवरून कमलाथल अम्माची माहिती मिळवली. त्यांनी ट्वीटरवर विचारलं होतं की, कोइम्बतूरमधील कमलाथल अम्मांची माहिती कोणी देईल का. त्यांना अनेकांनी अम्माची माहिती दिली होती. विकास खन्ना म्हणाले होते की, माझ्याकडं 350 किलो तांदूळ असून ते अम्माकडे पोहोचवायचं आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्यास मदत करा असं आवाहन त्यांनी केलं होतं.
अम्मापर्यंत तांदूळ पोहोचवण्यासाठी अनेक लोकांनी विकास खन्ना यांना मदत केली. विकास खन्ना यांनी मदर्स डेच्या शुभेच्छा देत तांदूळ पोहोचवलं. याची माहिती ट्विटरवरून त्यांनी दिली आहे. हे वाचा : बेस्टचा ‘बेस्ट’ निर्णय: मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना दीड महिन्यातच दिली नोकरी शेफ विकास खन्ना यांनी याआधी भारतातल्या 75 हून अधिक शहरांमध्ये रेशनचे वाटप केले आहे. कमलाथल अम्मा यांच्या कामामुळे विकास खन्ना हेच नाही तर उद्योगपती आनंद महिंद्रासुद्धा प्रभावित झाले आहेत. आनंद महिंद्रा यांनी अम्मांना गॅस आणि सिलिंडरही पोहोचवलं. आहे. हे वाचा : नरेंद्रभाई, आपको एक मेरी सलाह, असं म्हणत कवी मनाच्या नेत्यानं लिहिलं पत्र