नवी दिल्ली, 14 जुलै : अखेर चांद्रयान-३ चं यशस्वी प्रक्षेपण झालं असून 25 ऑगस्टपर्यंत चांद्रयान सुरक्षित चंद्रावर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान देशातील सर्व नागरिकांचं या ऐतिहासिक घटनेकडे लक्ष होते. चांद्रयानाचं प्रक्षेपण झालं आणि सर्व नागरिकांनी आनंदाचा सुस्कारा सोडला. दरम्यान सोशल मीडियावर एक ट्विट चांगलंच व्हायरल होत आहे. हे ट्विट आहे झोमॅटो या फूड डिलिव्हरी कंपनीचं. भारतीय संस्कृतीत कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात ही तोंड गोड करून घेते. झोमॅटोनेही इस्त्रोच्या अधिकाऱ्यांसाठी-वैज्ञानिकांसाठी एक खास पदार्थ डिलिव्हर केला आहे. झोमॅटो कंपनीने ट्विट करत याबाबत माहिती दिली. नोकरीच्या पहिल्या दिवशी किंवा अगदी परीक्षेला जाताना घरातून बाहेर पडण्यापूर्वी आई दही-साखर खाऊ घालते. त्यानुसार, झोमॅटोनेही इस्त्रोच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या मेहनतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Chandrayaan-3 : ‘जगाला सांगा कॉपी दॅट’ आभाळाला भेदून चांद्रयान असं पोहोचलं अंतराळात, पहिला VIDEO काय लिहिलंय ट्विटमध्ये या ट्विटमध्ये झोमॅटोनं म्हटलं आहे की, चांद्रयान-३ साठी इस्त्रोला दही-साखर पाठवत आहे. सध्या हे ट्विट व्हायरल होत असून नेटकरी त्यांचं कौतुकही करत आहे.
आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान-3 ने आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी यशस्वी उड्डाण केलं. गेल्या चार वर्षांमध्ये जवळपास 615 कोटी रुपयांचा खर्च करुन चांद्रयान - 3 विकसित करण्यात आलं. आज अखेर हे अंतराळयान अवकाशात झेपावलं आहे. चांद्रयान 3 ऑगस्टमध्ये लँड करेल आणि त्याचा लँडर आणि रोव्हर चंद्राच्या एक दिवसा इतके काम करणार आहे. चंद्राचा एक दिवस म्हणजे पृथ्वीचे 14 दिवस. लँडर आणि रोव्हर केवळ चंद्रावरील एका दिवसासाठी काम करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत, कारण ते रात्रीच्या अति थंडीचा सामना करू शकत नाहीत. त्यामुळे, त्यांना पहाटेच उतरावं लागतं.