JOIN US
मराठी बातम्या / देश / हिंसाचाराने वेढलेल्या दिल्लीत माणुसकीचं दर्शन, जीव धोक्यात घालून रैसुल इस्लाम यांनी केला औषध पुरवठा

हिंसाचाराने वेढलेल्या दिल्लीत माणुसकीचं दर्शन, जीव धोक्यात घालून रैसुल इस्लाम यांनी केला औषध पुरवठा

नवी दिल्लीमध्ये सध्या परिस्थिती अजूनही काही प्रमाणात धूमसत आहे. दिल्ली हिंसारात आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : नवी दिल्लीमध्ये सध्या परिस्थिती अजूनही काही प्रमाणात धूमसत आहे. दिल्ली हिंसारात आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. आज काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी देखील दिल्लीतील हिंसाचाराबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. ज्यांनी प्राण गमावले तो आकडा वाढतच आहे, त्याचबरोबर जखमींच्या संख्येतही वाढ होत आहे. इशान्य दिल्लीतील अनेक ठिकाणी रस्ते बंद होते. बंद ठेवण्यात आलेली मेट्रो वाहतूकही आजपासून सुरू झाली आहे. परिस्थिती चिघळल्यामुळे अनेक दुकानदारांनी आपली दुकानं बंदच ठेवली आहेत. (हेही वाचा- दिल्ली हिंसाचार प्रकरण : ‘परीक्षेला जाते सांगून गेली ‘ती’ घरी परत आलीच नाही’ ) आजपासून परिस्थिती काहीशी पूर्वपदावर येत असली तरीही यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत.  अशावेळी प्राथमिक उपचारांची आवश्यकता असते. पण इतर दुकांनांप्रमाणेच मेडिकल स्टोअर्सही बंद असल्याने अनेकांना औषधोपचारापासून वंचित रहावं लागतंय. अशावेळी रैसुल इस्लाम या मेडिकल दुकानदाराकडून माणुसकीचं दर्शन होतं. चांदबाग परिसरात रैसुल इस्लाम यांचं मेडिकल दुकान आहे. त्यांनी अशा परिस्थितीतही आपलं मेडिकल स्टोअर उघडलं असून ते औषधांचा पुरवठा करत आहेत.

संबंधित बातम्या

ते म्हणतात, ‘सध्या परिस्थिती आधीपेक्षा सुधारली आहे. ज्यांना गरज आहे अशांना औषधं पुरवण्याचा प्रयत्न मी करत आहे. दोन्ही समुदायांच्या सदस्यांनी या भागात शांतता मोर्चा काढला आणि परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर आली आहे.’ सध्या चांदबागमधील इतर दुकानही उघडण्यास सुरूवात झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या