नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : पूर्व उत्तर दिल्लीतील हिंसाचारादरम्यान दोन दिवसांपूर्वी परीक्षेला गेलेली 13 वर्षांची विद्यार्थिनी सोमवारपासून बेपत्ता असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेपत्ता झालेली विद्यार्थिनी इयत्ता 8वीमध्ये शिकत आहे. सोमवारी ही विद्यार्थिनी शाळेत परीक्षा द्यायला गेली होती. मात्र सोमवारपासून दोन दिवस परत घरी आलीच नसल्याची तक्रार पालकांनी दाखल केली आहे. ही विद्यार्थिनी दिल्लीतील सोनिया विहार इथे तिच्या कुटुंबियांसोबत राहात होती. विद्यार्थिनीच्या वडिलांचा गार्मेंट्सचा व्यवसाय आहे. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी संध्याकाळी 5.30 वाजता मुलीला आणण्यासाठी शाळेत जायचं होतं. मात्र त्याच वेळी त्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जमावाकडून हिंसाचार सुरू होता. त्यामुळे ते बाहेर पडू शकत नव्हते. त्यानंतर आजपर्यंत त्यांची मुलगी घरी आलीच नसल्याचं त्यांनी दिल्ली पोलिसांनी सांगितलं. वडिलांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बेपत्ता असल्याचा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा-सूनेने सासरच्या 6 जणांना सायनाइड देऊन मारले, तुरुंगात केला आत्महत्येचा प्रयत्न दिल्ली हिंसाचाराबाबतची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांना दिल्लीत धुमसणाऱ्या दंगलीविषयी 6 वायरलेस संदेश मिळाले होते. मात्र हे संदेश मिळाल्यानंतरही पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नसल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीतून समोर आली आहे. या प्रकरणात कॉग्रेसच्या सोनिया गांधी आज राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. दिल्ली हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे ही हिंसा झाल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या न्यायाधिशांची रातोरात बदली करण्यात आली आहे. न्यायाधीश एस मुरलीधर हे या प्रकरणावर जज म्हणून सुनावणी करत होते. आज पोलीस आपली बाजू मांडणार आहेत. मात्र आजची सुनावणी होण्याआधीच मुरलीधर यांची रातोरात पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे जज म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अचानक न्या. मुरलीधर यांच्या झालेल्या बदलीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे आज दिल्ली उच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हेही वाचा-दिल्ली धगधगतंय! घर जळतं होतं अन् आई घरात होती, पण तो काहीच करू शकला नाही
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.