JOIN US
मराठी बातम्या / देश / BREAKING : ओडिशानंतर 'या' राज्याने 1 मेपर्यंत वाढवला लॉकडाऊन

BREAKING : ओडिशानंतर 'या' राज्याने 1 मेपर्यंत वाढवला लॉकडाऊन

कोरोनाच्या वाढत्या कहरावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय़ घेतला आहे

जाहिरात

Mumbai: Police stop a scooterist while enforcing the complete lockdown imposed to contain the coronavirus pandemic, near Vashi in Mumbai, Tuesday, March 31, 2020. (PTI Photo/Kunal Patil) (PTI31-03-2020_000068B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चंदीगड, 10 एप्रिल : कोरोनामुळे (Covid - 19) संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पण कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे पंजाबमध्ये (Punjab) लॉकडाऊन (Lockdown) वाढवण्यात आला आहे. 14 एप्रिलवरून आता 1 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. पंजाब सरकारने देशातील कोरोना विषाणूची सुरू असलेल्या कहरामुळे लॉकडाऊन कालावधीत वाढ केली आहे. सध्या देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनची मर्यादा वाढविण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी यासंदर्भात मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शनिवारी ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बातचीत करतील आणि रविवारी याबाबत घोषणा करतील असे सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यापुढे 21 दिवसांपाठी म्हणजेच 1 मेपर्यंत लॉकडाऊनची मर्यादा वाढविण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

पंजाबचे स्पेशल चिफ सेक्रेटरी केबीएस सिंधू यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली. यापुढे 21दिवसांसाठी लॉकडाऊनची मर्यादा वाढविण्यात आली असून 1 मेपर्यंत याचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. यापूर्वी ओडिशा सरकारने लॉकडाऊनची मर्यादा वाढवली होती. देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन संपण्यापूर्वीच ओडिशा सरकारने कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी लागू केलेला लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय होता. असं करणारं हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. त्यानंतर पंजाब हे लॉकडाऊन वाढवणारं दुसरं राज्य ठरलं आहे. संबंधित - Coronavirus : न्यूयॉर्कमध्ये लागली मृतदेहांची रांग, एकत्रच दफन केले जात आहेत शव ‘लॉकडाऊनमध्ये गरीबाच्या पोटाला नाही घास, मात्र श्रीमंतांना सहलीला मिळतोय पास’ संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या