JOIN US
मराठी बातम्या / देश / भाजपच्या महिला कार्यकर्त्याची निर्घृण हत्या, डोक्यावर गोळी झाडून घेतला जीव

भाजपच्या महिला कार्यकर्त्याची निर्घृण हत्या, डोक्यावर गोळी झाडून घेतला जीव

भाजपच्या महिला कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोलकाता, 14 जून : पश्चिम बंगालमधील हिंसाचार दिवसेंदिवस वाढतच आहे. येथे आता भाजपच्या महिला कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बसीरहाट लोकसभा मतदारसंघातील हासनाबाद येथील ही घटना आहे. या महिलेच्या डोक्यावर गोळी झाडून तिची हत्या केली गेली. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या राजकीय वादातून झाली आहे का ?याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी बसीरहाटमध्ये राजकीय हिंसाचारातून भाजपच्या दोन आणि तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची हत्या झाल्याची माहिती समोर आली. यावरून भाजप आणि टीएमसीनं एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली. (पाहा : VIDEO : बंगालमध्ये अभाविप आणि तृणमूलचे कार्यकर्ते भिडले ) …तीन भाजप कार्यकर्त्यांची हत्या यापूर्वी 9 जून रोजी पश्चिम बंगालमधील 24 परगना येथे टीएमसी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली होती. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या तीन जणांची गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोप भाजपनं केला. दुसरीकडे कायुम मोल्लह यांच्या हत्येचा आरोप तृणमूल काँग्रेसनं भाजपवर केला आहे. झेंडे लावण्यावरून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीचं रुपांतर मोठ्या हाणामारीमध्ये झाले. ज्यात चार जणांना आपला जीव गमवावा लागला. (पाहा : SPECIAL REPORT:औरंगाबादेत सेनेचा रडीचा डाव, जलील यांचा सत्कार हाणून पाडला) SPECIAL REPORT: नीरा पाण्याच्या वादात उदयनराजेंची उडी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या