JOIN US
मराठी बातम्या / देश / ठाकरे सरकारला पाडण्याचा दिवस ठरला, भाजपने आखला मोठा प्लॅन?

ठाकरे सरकारला पाडण्याचा दिवस ठरला, भाजपने आखला मोठा प्लॅन?

राज्यातील महाविकास आघाडीसाठी नोव्हेंबर महिना हा धोक्याचा असणार आहे. कारण, महाविकास आघाडीला सुरुंग लावण्याचे दिल्ली दरबारी नियोजन सुरू झाले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 21 जुलै : महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीचे दिवाळीनंतर दिवाळे काढण्याचा प्लॅन भारतीय जनता पक्षाने आखला आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये सत्तापालट करण्याकरिता भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीनिशी तयार होत आहे, अशी माहिती पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे. सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे भारतीय जनता पक्षाला सत्तापलट करण्यात रस नाही. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा मुहूर्त निश्चित करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. कर्नाटक त्यानंतर मध्यप्रदेश आणि आता राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तापालट करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, राजस्थानमध्ये यांचा डाव यशस्वी होणार नाही, असेही काही नेत्यांना वाटत आहे. अन् शेतकऱ्याने ओतल्या दुधाच्या कॅन बैलांच्या अंगावर, पाहा हा VIDEO तर राज्यातील महाविकास आघाडीसाठी नोव्हेंबर महिना हा धोक्याचा असणार आहे. कारण, महाविकास आघाडीला सुरुंग लावण्याचे  दिल्ली दरबारी नियोजन सुरू झाले आहे. दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत जवळपास पन्नास मिनिटे प्रथमता चर्चा केली त्यानंतर अमित शहा यांनी फडणवीस यांना जेवणासाठी आमंत्रण दिले. अमित शहा यांच्या डिनर डिप्लोमसी मागे राज्यातील महाविकास आघाडीला सुरूंग लावण्याची नियोजन तर नाही ना? असा प्रश्न दिल्लीतील राजकीय गल्लीमध्ये उपस्थित केला जात आहे. सांगलीमध्ये पुन्हा लॉकडाऊन; कुठे, कसे असतील नियम? जयंत पाटलांनी दिली माहिती फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या सोबतच काही गुप्त बैठकी देखील झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातील डाव हा उलटा पडू नये, यासाठी सर्व ती काळजी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडून घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी माहिती दिली आहे. महाविकास आघाडी ही आपल्या कर्माने सत्तेच्या बाहेर पडेल, असा दावा भाजपचे नेते करत आहे. महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर भाजप सत्ता स्थापन करण्याकरिता सर्व ते प्रयत्न करणार आहे. यासाठी देखील खेळी खेळायला सुरुवात झाली आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी नोव्हेंबर महिन्यात खरंच महाविकास आघाडीचे दिवाळे निघते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या