बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये वेगवान वारे
राजकोट, 15 जून : चक्रीवादळ बिपरजॉय आज गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, चक्रीवादळाच्या आधीच गुजरातमध्ये जोरदार वारे वाहत आहेत. यामुळे किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी पत्र्याचे शेड उडून गेलेत तर काही ठिकाणी वाहनांचेही नुकसान झाले आहे. आता एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये पार्किंग करण्यात आलेल्या दुचाकी वाऱ्याने सरकल्याचं दिसत आहे. बिपरजॉय चक्रीवादळ येण्याआधी अशी अवस्था आहे तर ते आल्यानंतर किती भयंकर असेल अशा कमेंट्स युजर्स करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर एका युजरने म्हटलं की, “चक्रीवादळ जाऊदे फक्त, सर्वजण सुरक्षित रहावेत हीच प्रार्थना.” गुजरातच्या किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहत असून आकाशात काळे ढगही जमा झाले आहेत. चक्रीवादळासोबतच मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. आता एसी बंद करा, पावसाचं कुठे आहे आगमन? कोल्हापूरसह 6 शहरांचं आजचं तापमान केंद्र आणि राज्य सरकारने गुजरातच्या किनारपट्टी भागात राहणाऱ्या हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही परिस्थिती आणि तयारीचा आढावा घेतला आहे. लष्कराचे तिन्ही दल परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ते नेमके कोणत्या ठिकाणचे आहेत सांगणं कठीण आहे. पण एका युजरने २७ सेकंदाचा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं की, चक्रीवादळाचा गंभीर परिणाम होईल. कारण ते येण्याआधीच राजकोटमध्ये वारे जोरात वाहतायत. इतके वेगात की पार्किंगमध्ये उभा असलेल्या गाड्या बाजूला सरकत आहेत. एखादी जादुई ताकदच त्या गाड्यांना खेचते की काय असं वाटतं.