advertisement
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Weather Update Today : आता एसी बंद करा, पावसाचं कुठे आहे आगमन? कोल्हापूरसह 6 शहरांचं आजचं तापमान

Weather Update Today : आता एसी बंद करा, पावसाचं कुठे आहे आगमन? कोल्हापूरसह 6 शहरांचं आजचं तापमान

तापमानात आज कुठं घट होणार पावसाचं कुठे होणार आगमन? इथं चेक करा

  • -MIN READ

01
राज्यामध्ये काही ठिकाणी पावसाचे आगमन झाले असून उन्हाची तीव्रता कमी होताना दिसत नाही. काही ठिकाणी उष्णतेचा पारा चाळीशी पार कायम आहे.

02
नागपुरातील उष्णतेचा पारा काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. नागपुरात काल 14 जून रोजी कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस होते तर किमान तापमान 27.4 अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. नागपुरात काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या तर पारशिवणी येथे 5.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज 15 जून रोजी नागपुरातील वातावरण कोरडे असल्याचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

03
दिवसभरात आणि रात्री पडणाऱ्या तुरळक सरींमुळे कोल्हापुरातील तापमानात घट झालेली जाणवत आहे. मात्र उकाडा हा अजूनही असल्याने कोल्हापूरकरांना ऊन आणि पाऊस अशा दोन्हींसाठी तयार राहावे लागत आहे. तर आज 15 जून रोजी देखील हलक्या पावसासह सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान कोल्हापुरात काल 14 जून रोजी कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे.तर आज 15 जून रोजी देखील सारखेच म्हणजे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

04
मुंबईत काल 14 जून रोजी कमाल 33 अंश सेल्सिअस तर किमान 28 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज 15 जून रोजी कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअस असणार आहे.

05
छत्रपती संभाजीनगरमध्ये काल 14 जून रोजी किमान 22 अंश सेल्सिअस एवढे तापमान होते आणि कमाल तापमान हे 36 अंश सेल्सिअस होते. आज 15 जून किमान तापमान हे 22 अंश सेल्सिअस एवढे असेल आणि कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस एवढे असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

06
कल्याण डोंबिवलीत उन्ह आणि घामानं लोक हैराण आहेत. काल 14 जून रोजी कल्याण - डोंबिवलीत कमाल तापमान 35 होते तर किमान तापमान 28 होते. तर आज 15 जून रोजी कमाल तापमान 34 तर किमान तापमान 28 राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

07
पुण्यामध्ये काल 14 जून रोजी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस होते तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. आज 15 जून रोजी शहरातील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस असेल तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून अति हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • राज्यामध्ये काही ठिकाणी पावसाचे आगमन झाले असून उन्हाची तीव्रता कमी होताना दिसत नाही. काही ठिकाणी उष्णतेचा पारा चाळीशी पार कायम आहे.

    MORE
    GALLERIES