JOIN US
मराठी बातम्या / देश / लॉकडाऊनमध्ये प्रसिद्ध व्यवसायिकाची गोळी घालून हत्या, अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO

लॉकडाऊनमध्ये प्रसिद्ध व्यवसायिकाची गोळी घालून हत्या, अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO

ही घटना सीतामढी शहर पोलिस स्टेशन परिसरातील लोहा पट्टी परिसरात घडली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सीतामढी, 20 मे : कोरोना महासंकटाच्या काळात लॉकडाऊनदरम्यान बिहार पोलिसांना आरोपी वारंवार चकवा देत हत्या करत आहेत. बुधवारी पुन्हा एकदा भर रस्त्यात आरोपींनी प्रसिद्ध व्यवसायिकाची निर्घृण हत्या केली आहे. हत्येचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. गाडीवरून येणाऱ्या तीन जणांनी गोळी घालून भरदिवसा हत्या केली आहे. ही घटना सीतामढी शहर पोलिस स्टेशन परिसरातील लोहा पट्टी परिसरात घडली. तिथले प्रसिद्ध व्यापारी प्रभास हिसारिया यांची बुधवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्येची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या व्हिडिओवरून हे स्पष्ट झाले आहे की, स्कूटीवर बसलेल्या तीन तरुणांनी प्रभास यांच्यावर दुकानात जात असताना हल्ला केला.

शहरातील गर्दीच्या ठिकाणी ही भयानक हत्या झाली आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की एक स्कुटरवरून तीन जण येत आहेत. दोन जण स्कूटरवर बसून आहेत तर तिसरा व्यक्ती खाली उतरतो. लॉकडाऊनमुळे अनेक दिवसांपासून हे दुकानं बंद होते. मात्र सरकारनं नियम शिथिल केल्यानंतर आज दुकानं उघडण्यासाठी आला असताना हा प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून अज्ञात सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. हे वाचा- कोरोना रुग्णाच्या मृतदेहात किती वेळ राहतो व्हायरस? ICMRने दिली महत्त्वाची माहिती हे वाचा- वर्षभरात कोरोना व्हायरस होणार नष्ट, 6 महिन्यांमध्ये येणार बाजारात औषध! हे वाचा- बाल्कनीतून दीड वर्षांचा चिमुकला कोसळला, अंगावर शहारे आणणारा धक्कादायक VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या