न्यूयॉर्क 20 मे: जगभरात 3 लाखांपेक्षा जास्त बळी घेणाऱ्या कोरोना व्हायरसवर औषध शोधण्यासाठी जगभरातले शास्त्रज्ञ एकत्र आले आहेत. कुठल्याही परिस्थितीत व्हायरसला रोखण्यासाठी शास्त्रज्ञ सगळे पर्याय वापरून औषध शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. यात मॉडर्ना कंपनीने केलेला दावा जगभर चर्चेचा विषय बनला होता. शरिरात प्रतिकार शक्ती तयार करणारं औषध तयार केल्याचा दावा या कंपनीने केला आहे. पुढच्या वर्षभरात कोरोना नष्ट होईल आणि सहा महिन्यांमध्ये त्यावर औषध येईल अशी आशा अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. औषध तयार झालं तर ते जगभर कसं पोहोचवायचं आणि त्याचं उत्पादन अतिशय मोठ्या प्रमाणावर कसं करायचं यावरही काही तज्ज्ञ काम करत असून त्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. जगातल्या आठ कंपन्यांनी व्हायरसला रोखणारी Antibody’s तयार केल्याचा दावा केला आहे. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थनं केलेल्या अभ्यासात असं दिसून आलं की, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यातील अँटिबॉडीजप्रमाणेच ही लस दिलेल्या व्यक्तींच्या शरीरात अँटिबॉडीज तयार झाल्या. या अभ्यासात सहभागी झालेल्या व्यक्तींना तीन वेगवेगळे डोस देण्यात आले. या डोसनुसार व्हायरसशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक क्षमता वाढत असल्याचं दिसून आलं. लसीशिवाय 5 दिवसांत असा बरा होणार कोरोना रुग्ण, शास्त्रज्ञांचा सर्वात मोठा दावा ही लस तयार करण्यासाठी व्हायरसचा वापर केलेला नाही तर कोरोनाचा जेनेटिक कोड तयार केला आहे. ही लस सुरक्षित असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. आता पुढील चाचणी जुलैमध्ये करण्याचा कंपनीचा विचार आहे.
What you need to know about the COVID-19 pandemic on 20 May https://t.co/DONk9AdUbc pic.twitter.com/dzp7IGbaTo
— World Economic Forum (@wef) May 20, 2020
या औषधांचे प्रयोग सुरू असून सहा महिन्यांमध्ये ठोस निष्कर्ष निघतील असा या शास्त्रज्ञांचा दावा आहे. कुठल्याही औषधाला बाजारात येण्यासाठी किमान काही वर्ष लागतात. कारण त्या औषधांच्या असंख्य चाचण्या केल्या जातात. सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ते बाजारात आणलं जातं. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ट्रम्प घेत आहेत ‘हे’ वादग्रस्त औषध मात्र आणीबाणीची परिस्थिती असल्याने कोरोनावरच्या औषधांसाठी वेगळी पद्धत अवलंबण्यात येत असून काही गोष्टींना फाटा देत चाचण्या करण्यात येत आहेत. हे औषध घातक नाही किंवा त्यांचे फार गंभीर साईड् इफेक्टस नाहीत याची खात्री सगळ्यात आधी शास्त्रज्ञ करत आहेत.