कोरोना रुग्णाच्या मृतदेहात किती वेळ राहतो व्हायरस? ICMR ने दिली महत्त्वाची माहिती

कोरोना रुग्णाच्या मृतदेहात किती वेळ राहतो व्हायरस? ICMR ने दिली महत्त्वाची माहिती

कोरोना रुग्णाच्या मृतदेहाच्या संपर्कात येताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं ICMR ने म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 मे : कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू (corona patient deadbody) झाल्यानंतर त्याच्या मृतदेहातून व्हायरस पसरण्याच्या भीतीने अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करू दिले जात नाहीत. मात्र खरंच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या शरीरामार्फत व्हायरस पसरण्याचा धोका आहे का? मृतदेहामध्ये व्हायरस किती वेळ राहतो? याबाबत इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) महत्त्वाची माहिती दिली आहे.

कोरोना रुग्णाच्या मृतदेहात व्हायरस हळूहळू कमी होतो, मात्र किती वेळात कमी होतो हे माहिती नाही, असं आयसीएमआरने म्हटलं आहे. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशा सूचनाही आयसीएमआरने दिल्यात.हे वाचा -  कोरोनामुक्त रुग्ण पुन्हा कोरोनाग्रस्त झाल्यास त्याच्यामार्फत व्हायरस पसरतो का?मृतदेहातून कोरोनाव्हायरस कधी नष्ट होतो याबाबत आयसीएमआरला विचारणा करण्यात आली. त्यावेळी आयसीएमआरनं सांगितलं, कोरोना रुग्णाच्या मृत शरीरातून व्हायरस हळूहळू कमी होतो. मात्र त्यासाठी किती कालावधी लागतो, तो पूर्णपणे कधी नष्ट होतो याचा कालावधी निश्चित नाही. त्यामुळे मृतदेहाच्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी आवश्यक ती सर्व काळजी घ्यायला हवी.

पोस्टमॉर्टम करताना चिरफाड नको

मृतदेहांचं पोस्टमॉर्टम करताना चिरफाड करण्याची गरज पडणार नाही, अशा पद्धतीचा अवलंब करावा, असंही आयसीएमआरनं सांगतलं आहे.  कोरोना संशयिताचा मृत्यू झाला आणि त्याचे टेस्ट रिपोर्ट नेगेटिव्ह आले तर त्याच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टबाबतही आयसीएमआरने मार्गदर्शन केलं आहे. बहुतेक कोरोना टेस्ट चुकीच्या येत असल्याची प्रकरणं लक्षात घेत प्रत्येक संशयित कोरोना प्रकरणं समजावं आणि महासाथीच्या या परिस्थितीत मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम करताना चिरफाड करू नये, असा सल्ला आयसीएमआरने दिला आहे.

मृतदेहापासून कोरोनाचा धोका नाही, बीएमसीचा कोर्टात दावा

संक्रमित मृतदेहापासून इतरांना Covid0-19 चा संसर्ग होत नाही, असा दावा एका याचिकेसंदर्भात उत्तर देताना मुंबई महापालिकेनं केला आहे. आधीच्या नियमावली आणि शंकांना छेद देणारा हा दावा असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

हे वाचा -  मुंबई महापालिकेचा आता कोर्टात दावा - मृतदेहापासून कोरोना संसर्गाचा धोका नाहीच

मृतदेहापासून कोरोनाचा प्रसार होत असल्याची शंका असल्याने सर्व जगभरात कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाच्या अंत्यविधीबाबत नियमावली पाळली जात आहे. भारतात आणि मुंबईतही तसे नियम आहे. कोरोनाबळींच्या मृतदेहाचे अंत्यविधी करताना आम्ही पुरेशी काळजी घेतो आणि नियमांचं पालन करतो, असं सांगत असतानाच मुंबई महापालिकेनं मृतदेहापासून संसर्ग होत असल्याचा कुठलाही पुरावा नाही, असाही दावा केला आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: May 20, 2020, 3:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading