JOIN US
मराठी बातम्या / देश / Seema Haider Love Story : सीमा-सचिनच्या लव्ह स्टोरीमध्ये मोठा खुलासा, फक्त भाऊच नाही तर काकासुद्धा...

Seema Haider Love Story : सीमा-सचिनच्या लव्ह स्टोरीमध्ये मोठा खुलासा, फक्त भाऊच नाही तर काकासुद्धा...

सीमा हैदर प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे.

जाहिरात

सीमा हैदर प्रकरण अपडेट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 17 जुलै : पाकिस्तानातून सीमापार करुन प्रियकराला भेटायला आलेली चार मुलांची आई सीमा हैदरचे प्रकरण सध्या देशात फार चर्चेत आहे. सचिन आणि सीमा हैदरच्या लव्ह स्टोरीमध्ये मोठा खुलासा झाला आहे. सीमा गुलाम हैदर प्रकरणात आता आणखी एक गोष्ट समोर आली आहे. तपासात समोर आले आहे की, सीमा गुलाम हैदर हिचा काका पाकिस्तान सैन्यात सुबेदार आहे. याआधी तिचा भाऊ हा पाकिस्तानी सैन्यात असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता सीमा एक पाकिस्तानी एजंट असल्याचा संशय बळावला असून त्यादिशेने तपास करण्यात येत आहे. सीमाचे आयकार्ड उच्चायुक्तामध्ये तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच उत्तरप्रदेश एटीएस, आयबी आणि नोएडा पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. सीमा-सचिनच्या लव्ह स्टोरीचा होणार 72 तासांमध्ये शेवट? प्रकरणात आले नवे वळण सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेश एटीएसची टीम केंद्रीय तपास यंत्रणांसोबत सीमासोबत पाकिस्तानाहून दुबई आणि मग नेपाळहून भारतात येणाऱ्या नेटवर्कला तपासत आहे. सीमा सचिनच्या संपर्कात केव्हापासून होती, दोघांमध्ये कोणकोणत्या मोबाईल नंबरवरुन संवाद झाला होता, याचाही तपास केला जात आहे. सीमाला कुणीही न थांबवता ती दुबईहून नेपाळमार्गे भारतात आली, यावर विश्वास बसत नाहीए. हेही वाचा -  यामुळे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय तपास यंत्रणा या सीमाची माहिती काढत आहेत. तिची संपूर्ण प्रोफाईल नेमकी काय आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच तिच्या परिवाराचीही माहिती काढण्यात येत आहे. तर केंद्रीय तपास यंत्रणांकडून तपास सुरू झाल्यानंतर नोएडा पोलिसांनी सीमा यादवच्या जामीन अर्ज फेटाळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सीमा ही साक्षीदारांना प्रभावित करू शकते, किंवा फरार होऊ शकते, असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी कायदेशीर सल्ला घेतल्यावर जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, यासाठी न्यायालयात याचिका देण्याची पूर्ण तयारी केली आहे. याप्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या