JOIN US
मराठी बातम्या / देश / 'डीजे वाले बाबू' गाण्यावरून वाद पेटला, नवरा-बायकोला लाथाबुक्क्यांनी मारहाण VIRAL VIDEO

'डीजे वाले बाबू' गाण्यावरून वाद पेटला, नवरा-बायकोला लाथाबुक्क्यांनी मारहाण VIRAL VIDEO

एका लग्न समारंभात डीजेवर नाचताना किरकोळ वादातून नवदाम्पत्यांनी एकमेकांना मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

जाहिरात

viral video

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पियुष शर्मा (मुरादाबाद), 26 एप्रिल : उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका लग्न समारंभात झालेल्या भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, लग्नमंडपात नाचत असताना अचानक एकमेकांशी लोक भांडताना दिसत आहेत. आश्चर्य म्हणजे या हाणामारीत नवरदेव स्वत: एकमेकांना मारताना दिसत आहे.

मुरादाबादमध्ये एका लग्न समारंभात डीजेवर नाचताना किरकोळ वादातून नवदाम्पत्यांनी एकमेकांना मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली यातून थेट मारामारी झाली.  

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला, 11 जवान शहीद

संबंधित बातम्या

या सगळ्यात एकाने या संपूर्ण गोंधळाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला. त्यानंतर तो व्हिडिओ बघता बघता लाखो लोकांच्या हातात गेला. ही घटना उत्तर प्रदेशातील माढोळा येथे घडली. दरम्यान हे सगळं प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे.

या घटनेबाबत माहिती देताना एसपी सिटी अखिलेश भदोरिया म्हणाले की, एका घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. सध्या पोलीस या घटनेची माहिती घेत आहेत. याबरोबर मारामारीत सहभागी असलेल्यांचीही ओळख पटवली जात आहे.

स्वत:ची Instagram Story वारंवार पाहता? मग या मागची सायकोलॉजी माहितीय का?

भदोरिया यांच्या म्हणण्यानुसार याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल असे ते म्हणाले.  हा संपूर्ण वाद डीजे वाले बाबू या गाण्यावरून झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या