नागपूर 26 एप्रिल: कोरोना विरुद्ध सगळा देश लढत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज बौद्धिक वर्ग घेतला. नागपूरमधून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वयंसेवकांना संबोधित केलं. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी थंड डोक्याने विचार केला पाहिजे तरच आपण त्यात विजय मिळवू. या काळ्यात काही समाजकंटक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यापासून सावध राहा असं आवाहनही त्यांनी केलं. ते म्हणाले, देशात कोरोनाविरुद्ध लढाई सुरू आहे. अशा काळात काही लोकांनी चूक केली तर सर्व समुदायाला दोष देऊ नका असं आवाहनही त्यांनी केलं. तबलिगी जमातवरून मुस्लिम समुदायाला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता त्यावरून भागवतांनी नाव न घेता हे आवाहन केलं. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात केंद्र सरकारने चांगलं काम केलं आहे. भारत सर्व जगाला औषधं पुरवित आहे. देशातले 130 कोटी लोक आपले आहेत, त्या सगळ्यांसाठी काम करायचं आहे असंही त्यांनी सांगितलं. अशा संकटाच्या काळात मनोधैर्य न खचू देता काम करावं असंही त्यांनी सांगितलं. पालघर प्रकरणात ज्या साधुंची हत्या झाली ते कृत्या अतिश निंदनीय होतं. असं घडायला नको होतं. दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. हे वाचा - कॅन्सरच्या रुग्णाला औषध देण्यासाठी तरुणांनी केला 700 किमी बाईकवरून प्रवास कोरोनाविरुद्धच्या लढाईत लाखो स्वयंसेवक काम करत आहेत आणि पुढेही करत राहातील. जनतेने सरकारने सांगितलेल्या नियमांचं पालन केलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. या काळात राजकारण करू नका देशहिताला प्राधान्य द्या असं आवाहनही त्यांनी सर्व राजकीय पक्षांना केलं. हेही वाचा - कोरोना योद्धा : कॅन्सर शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवसापर्यंत IPS अधिकारी ड्यूटीवर 45 दिवसांनी लेकरं भेटली आईला, सुप्रिया सुळेंची अशीही मदत