नवी दिल्ली, 26 एप्रिल : राष्ट्रीय राजधानी दिल्ली (Delhi) मध्ये तैनात असलेले एक तरुण आयपीएस अधिकारी कर्करोगाने (Cancer) ग्रस्त असूनही आपल्या कामासाठी तत्पर आहेत. आनंद मिश्रा नावाचे हे अधिकारी दिल्ली पोलिसात अतिरिक्त डीसीपी म्हणून तैनात आहेत. डॉक्टरांनी जेव्हा त्यांना थायरॉईड ग्रंथीच्या कर्करोगाच्या वाढीविषयी माहिती दिली तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. असे असूनही या आयपीएस अधिकाऱ्याने शांतपणे आपले काम सुरू ठेवले. लॉकडाऊनमुळे मोठ्या संख्येने मजुर अडकलेल्या भागात त्यांनी मोठ्या हिमतीने काम केले
अलीकडेच डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. त्याच्या ग्रंथींमध्ये कर्करोग खूप वेगाने पसरत होता. ड्यूटीनंतर मिश्रा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले आणि ऑपरेशन करण्यात आले. सध्या मिश्रा हे पुढील 48 तासांसाठी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.
त्याच्या टीमबरोबर सतत काम करत होते
दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की हे अधिकारी दिल्लीच्या बाहेरील भागात सुरू असलेल्या मदतकार्यासाठी सतत काम करत होते. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, "दररोज आपल्या पथकासह ते येथे अडकलेल्या परप्रवासी मजुरांना अन्न वाटप करण्याच्या कामावर सतत नजर ठेवून होते."
घशात दुखण्याची तक्रार
त्यांच्या एका सहकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले की 1 एप्रिल रोजी मिश्रा यांना घशात दुखण्याचा त्रास होत होता. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. कोरोनासह अनेक चाचण्यांनंतर, त्याच्या कर्करोगाबद्दल माहिती मिळाली. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे.
डॉक्टरांनी त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला
तपासणीनंतर डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्याचे सहकारी म्हणाले की, असे असूनही त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी कर्तव्य बजावले. त्यांना शस्त्रक्रियेसाठी राजीव गांधी कर्करोग संस्था आणि संशोधन केंद्रात दाखल करण्यात आले.
स्थितीत सुधारणा
त्याचा भाऊ जितेंद्र कुमार यांच्या म्हणण्यानुसार, शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती सुधारत आहे. डॉक्टरांनी त्याला पुढील 48 तास सतत निरीक्षणाखाली ठेवले आहे. हा काळ खूप नाजूक आहे.
संबंधित-ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस सोमवारपासून कार्यभार स्वीकारण्याची शक्यता; म्हणाले...